Beating : नगर : पैशांच्या देवाणघेवाणीच्या (Monetary Transactions) कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला रॉडने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल सुरेश घाटेशाही (वय ३०, रा. गवळीवाडा, भिंगार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : अखेर भोंदू राजेंद्र गडगे याला मिळाला जामीन; दुर्धर आजार बरे करण्याचा केला होता दावा
वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद बांबू गल्ली, बंगाल चौकी परिसरात २८ मे रोजी घडला. फिर्यादी अमोल घाटेशाही आणि आरोपींमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले. आरोपी साकीब आमिन अक्तार आणि रिहान आमिन अक्तार (दोघे रा. मोमिन गल्ली, भिंगार) यांनी त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन अनोळखी साथीदारांसह अमोल यांना गाठले. जुन्या वादाचा राग मनात धरून या चौघांनी अमोल यांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अमोल यांना शिवीगाळ (Beating)
भांडणादरम्यान संशयित आरोपींनी अमोल यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने अमोल यांच्यावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी साकीब अक्तार, रिहान अक्तार आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे



