Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरे हाती घेणार ‘कमळ’; आज दुपारी मुंबईमध्ये ‘भाजप’त प्रवेश

Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरे हाती घेणार 'कमळ'; आज दुपारी मुंबईमध्ये 'भाजप'त प्रवेश

0
Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरे हाती घेणार 'कमळ'; आज दुपारी मुंबईमध्ये 'भाजप'त प्रवेश
Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरे हाती घेणार 'कमळ'; आज दुपारी मुंबईमध्ये 'भाजप'त प्रवेश

Prajakt Tanpure : राहुरी : राहुरीचे माजी आमदार व माजीमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. उद्या मुंबईत भाजप (BJP) पक्ष कार्यालयात हा सोहळा दुपारी होणार आहे. विधानपरीषद स्थानिक स्वराज्य अहिल्यानगर मतदार संघातून महायुती तर्फे भाजपचा उमेदवारी त्यांना मिळणार असल्याचे बाेलले जात आहे. तसेच ते एक जूनला अर्ज दाखल करणार असल्याची माहीती समाेर येत आहे.

राजकारणात पक्षनिष्ठा ही महत्त्वाची आहेच परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्याला देखील विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार विखे, राजळे, कोल्हे, पिचड, पाचपुते आदींनी केव्हाच भाजपची वाट धरली. प्राजक्त तनपुरे आज या वाटेवर येत आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात अक्षय कर्डिले यांचा सहज विजय व्हावा म्हणून पडद्याआड ज्या घडामोडी घडल्या त्या आता दृष्टीपथात येत आहेत. अशी काही चर्चा झाल्याचे त्यावेळी पक्ष किंवा तनपुरे यापैकी कोणीही सांगितलेले नव्हते. मात्र माध्यमात याची जोरदार चर्चा चालू होती. तीच आता खरी होताना दिसते आहे.

प्राजक्त तनपुरे यांना 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील भाजपचे मंत्री, नेत्यांनीही ऑफर दिलेली होती. आपण भारतीय जनता पक्षात या. आपले सर्व प्रश्न सोडवले जातील असा निरोप वाड्यावर दिला होता. मात्र या प्रस्तावावर ते वेळीच निर्णय घेऊ शकले नाहीत. बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे जिल्हा सहकारी बँकेवर या सहमती राजकारणातूनच दोनदा बिनविरोध निवडले गेले. तसेच त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे मामा माजी मंत्री जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे एकत्रितपणे राजकीय निर्णय घेतील अशी वंदता होती मात्र बदललेल्या परिस्थितीत मामांनीच याबाबतचे सूत्र हलवली असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांचे साडू आमदार राहुल कुल यांनी देखील या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यावेळीही भारतीय जनता पक्ष तसेच विधान सभा निवडणुकीपूर्वीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही स्वतः प्राजक्त तनपुरे यांचेशी फोनवर संपर्क साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या गटातून त्यांनी राहुरी विधानसभेची निवडणूक लढवावी याबाबत प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. मात्र या दोन्हीही प्रस्तावावर तनपुरे निर्णय घेऊ शकले नाहीत. कदाचित शरदचंद्र पवार यांची साथ सोडण्यासाठी त्यांचे मन धजावत नव्हते. भाजप व जिल्ह्यातील या पक्ष नेतृत्व यांचेशी न जूळवन घेण्याची अर्थात पंगा घेण्याची किंमत प्राजक्त तनपुरे यांना मोजावी लागली. तशीच किंमत पाच वेळेस आमदार असलेल्या प्रसाद तनपुरे यांनाही मोजावी लागली. सत्ताधारी पक्षाबरोबर असण्याचे अनेक फायदे असतात. शिवाय विकास कामे होण्यासाठी ते गरजेचे असतेच. या भूमिकेतूनच अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले आणि त्यांच्या सर्व आमदारांनी महायुतीशी जुळवून घेतले. त्यावेळी राहिलेली ही गोष्ट आता तालुक्यात पूर्ण होत आहे. म्हणून जयंत मामा प्रतीची कृतज्ञता म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी डीपीवर जयंत मामांना राम राम करतानाचा फोटो ठेवला आहे. अशी माध्यमात ज़ोरात चर्चा आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत ऐन वेळेस एनसीपी पक्षाचा एबी फॉर्म येवूनही निवडणुकीत न उतरण्याची भूमिका प्राजक्त तनपुरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट फोनवर प्राजक्त तनपुरे यांचा संपर्क झाला होता. त्यावेळी पक्षाला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती, ती मान्य केल्यामुळे त्यावेळी दिलेला शब्द देवाभाऊ आता पूर्ण करणार असल्याचे बाेलले जात आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या साठी इच्छुक होते मात्र तनपुरे यांना दिलेला शब्द भाजप पाळणार असल्याचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत. विधानसभेतून मघार घेण्याच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट भाजप तनपुरे यांना देणार आहे. असे झाल्यास राहुरीला दोन आमदार तेही सत्ताधारी गटाचे अर्थातच भारतीय जनता पक्षाचे मिळणार आहेत. अशी वेळ राहुरीच्या राजकारणात प्रथमच येणार आहे.