
Beed gang that stole Mangalsutras nabbed : नगर : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या बीड जिल्ह्यातील टोळीचा (Beed gang that stole Mangalsutras nabbed) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
या संशयिताना घेतले ताब्यात
परशुराम मल्हारी गायकवाड (वय ४५, रा. सुभाष कॉलनी पेठ, बीड), लक्ष्मी संजय लोखंडे (वय ५९, रा. मोहटादेवी मंदिरामागे, वडवणी, जि. बीड) आणि पूजा विशाल मोहिते (वय २७, रा. नाळवंडी नाका, शास्त्रीनगर, बीड) या संशयिताना ताब्यात घेतले. कर्जत येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या अयोध्या दिगंबर कोरडे (वय ६२) या २७ ऑगस्ट रोजी जामखेडला जाण्यासाठी कर्जत बसस्थानकावर आल्या होत्या. एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गोपनीय माहितीच्या आधारे तपास (Beed gang that stole Mangalsutras nabbed)
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना ३ सप्टेंबर रोजी पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित मिरजगाव बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून परशुराम मल्हारी गायकवाड (वय ४५, रा. सुभाष कॉलनी पेठ, बीड), लक्ष्मी संजय लोखंडे (वय ५९, रा. मोहटादेवी मंदिरामागे, वडवणी, जि. बीड) आणि पूजा विशाल मोहिते (वय २७, रा. नाळवंडी नाका, शास्त्रीनगर, बीड) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी हा गुन्हा कौसाबाई सर्जेराव गायकवाड (रा. गांधीनगर, बीड) हिच्यासह केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने नातेवाईकांकडे ठेवले असून, उर्वरित दागिने कौसाबाई गायकवाड हिच्याकडे असल्याचेही चौकशीत समोर आले. यानंतर पंचांसमक्ष आरोपी परशुराम गायकवाड याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे हजर केलेले ४५ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत. कौसाबाई सर्जेराव गायकवाड ही महिला आरोपी फरार असून, तिचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, मनोज साखरे, योगेश कर्डीले, महादेव भांड, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली.


