Vehicle Series : दुचाकी वाहनांसाठी नवीन वाहन मालिका; पसंती क्रमांकासाठी 7 सप्टेंबर रोजी करता येणार अर्ज

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

0
Vehicle Series : दुचाकी वाहनांसाठी नवीन वाहन मालिका; पसंती क्रमांकासाठी 7 सप्टेंबर रोजी करता येणार अर्ज
Vehicle Series : दुचाकी वाहनांसाठी नवीन वाहन मालिका; पसंती क्रमांकासाठी 7 सप्टेंबर रोजी करता येणार अर्ज

Vehicle Series : नगर : दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका (Vehicle Series) सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी अडीच  वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह (Demand Draft) अर्ज चांदणी चौकातील नवीन आरटीओ (RTO) इमारतीत खिडकी क्रमांक 14 (रोखपाल) येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडावे. तसेच, अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीचा आधार कार्डला सलंग्न असलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. 

पसंती क्रमांकासाठीचा डिमांड ड्राफ्ट हा अहमदनगर कैम्प क्रैच ट्रेझरी ब्रेच कोड नं 13296 करीता देय असावा. हा डिमांड ड्राफ्ट RTO AHILYANAGAR या नावाने काढण्यात यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

नक्की वाचा : केडगावातून १८ किलो गांजा जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई

7 सप्टेंबर रोजी यादीप्रदर्शित करण्यात येणार

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी 7 सप्टेंबर रोजी साडेचार वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी 8 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी होणाऱ्या लिलावात सहभागी होण्यासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून खिडकी क्रमांक 14 वर जमा करावे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन (Vehicle Series)

लिलावात सहभागी अर्जदारांती  8 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे, कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्टचे लिफाफे अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट सादर केला असेल त्यांना तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमासाठी कोणत्याही अर्जदारास दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.