Scam in the MahaUrja Department recruitment process : महाऊर्जा विभागात भरती प्रक्रियेतही घोटाळा; हिवरे बाजार येथील आप्पासाहेब ठाणगे यांचा आरोप

Scam in the MahaUrja Department recruitment process : महाऊर्जा विभागात भरती प्रक्रियेतही घोटाळा; हिवरे बाजार येथील आप्पासाहेब ठाणगे यांचा आरोप

0

Scam in the MahaUrja Department recruitment process : नगर : केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि घोटाळे समोर येत असताना, आता “महाऊर्जा” भरती प्रक्रियेतही घोटाळा (Scam in the MahaUrja Department recruitment process) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या हिवरे बाजार (Hiware Bazar) येथील आप्पासाहेब ठाणगे या उमेदवाराने या भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे…”महाऊर्जा” विभागाच्या प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि लेखाधिकारी पदासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेचा निकाल आणि कागदपत्रे पडताळणी

एप्रिल 2026 मध्ये परीक्षेचा निकाल आणि कागदपत्रे पडताळणी करण्यात केली. मात्र पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर न करताच जवळपास 11 उमेदवारांना “महाऊर्जा” ने नियुक्ती दिली. दरम्यान प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदासाठी परीक्षा दिलेल्या आप्पासाहेब ठाणगे यांची प्रतीक्षा यादीत निवड झाली, मात्र आप्पासाहेब ठाणगे यांच्या आधी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी बनावट अनुभवाचे प्रमाणपत्र दिल्याचा संशय त्यांना आला. याआधारे त्यांनी सर्वच उमेदवारांची माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यातील बहुतांश उमेदवारांनी अनुभवाचे प्रमाणपत्र हे बनावट सादर केले असल्याचे समोर आले अस ठाणगे यांचं म्हणणं आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निकष पूर्णच केले नसताना देखील नियुक्ती दिली (Scam in the MahaUrja Department recruitment process)

अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पात काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव या पदासाठी आवश्यक असताना बहुतांश उमेदवारांनी बनावट अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले असल्याचं ठाणगे यांचं म्हणणं आहे. सोबतच भरतीतील जाहिरातीमध्ये दिलेले निकष बहुतांश उमेदवारांनी पूर्णच केले नसताना देखील त्यांना “महाऊर्जा”ने नियुक्ती दिली असल्याचा आरोप ठाणगे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी “महाऊर्जा”चे महासंचालक यांच्याकडे लेखी आणि तोंडी अशी वारंवार तक्रार केली, आक्षेप घेतले. मात्र त्याला दाद मिळाली नाही, दरम्यान याबाबत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून चौकशी व्हावी आणि अपात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढून पात्र उमेदवारांची नियुक्ती करावी तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ठाणगे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.