
School bus inspection in Shrirampur city : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नाही फिटनेसपासून फायर बॉटल, फर्स्ट एड, इमर्जन्सी एक्झिट अन् चालकांचीही कसून तपासणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी (Safe Transportation of Students) श्रीरामपूर शहरात प्रथमच विशेष स्कूल बस तपासणी मोहीम (School bus inspection in Shrirampur city) राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर पोलीस, शिर्डी वाहतूक शाखा (Shirdi Traffic Branch) व RTOच्या संयुक्त पथकाने ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत ६६ वाहनांची तपासणी केली.

सर्व बाजूंनी कसून तपासणी
फिटनेस, परवाना, विमा, परमिट, PUC, चालकाचा परवाना व युनिफॉर्म, फायर बॉटल, प्रथमोपचार पेटी, इमर्जन्सी एक्झिट, सुरक्षा काचा-जाळी, CCTV/GPS, वेगमर्यादा तसेच चालक मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत आहे का, याची कसून तपासणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई (School bus inspection in Shrirampur city)
नियमांचा भंग करणाऱ्या ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात लायसन नॉट कॅरी-२, PUC-१, चालक युनिफॉर्म-६, अतिरिक्त प्रवासी-६, फायर बॉटल-६, प्रथमोपचार पेटी-५, फिटनेस-२, इमर्जन्सी एक्झिट-३ आणि सेफ्टी काचा-जाळी-२ प्रकरणांचा समावेश आहे.

‘विद्यार्थ्यांच्या जीविताशी तडजोड नाही’ असा स्पष्ट इशारा देत यापुढेही अधिक कठोर तपासणी केली जाणार असून, स्कूल बस चालक-मालक, शाळा प्रशासन व पालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


