Bhingar Camp Police Station : बंद घराचे कुलूप तोडून १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhingar Camp Police Station : बंद घराचे कुलूप तोडून १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Bhingar Camp Police Station : बंद घराचे कुलूप तोडून १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bhingar Camp Police Station : बंद घराचे कुलूप तोडून १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhingar Camp Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर (Burhan Nagar) परिसरातील गुगळे कॉलनी येथे बंद घराचे कुलूप दिवसा तोडून चोरट्याने सुमारे १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास (Gold jewelry stolen) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविता रमेश बनसोडे (वय ४८, रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी सोमवारी (ता.३१) फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती

कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश

शनिवारी (ता. २९) सकाळी ११ ते सायंकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान बनसोडे यांच्या राहत्या घराला कुलूप होते. याच कालावधीत चोरट्याने घराच्या कुलपाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे अक्कासाहेब डोरले, ३ ग्रॅमचे दोनपळी मंगळसूत्र, ६ ग्रॅमची ठुशी, १० ग्रॅमचा चोकर, १० ग्रॅमची सोन्याची चैन, २६ ग्रॅमच्या दोन बांगड्या, ५ ग्रॅमची कानातील फुले, ३ ग्रॅमच्या कानातील वेल, ७ ग्रॅमचे मिनी गंठन, २ ग्रॅमचा क्रॉस, ६ ग्रॅमच्या १२ सुट्या मनी, ९ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, ४ ग्रॅमचे झुमके, ५ ग्रॅमचा कानातील सेट आणि ८ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या अशा दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ८३ हजार रूपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांकडून तपास सुरू(Bhingar Camp Police Station)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, उपनिरीक्षक योगेश पवार, सुहास आव्हाड आणि बी. बी. अकोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.