
Bhingar Camp Police Station : नगर : शहरातील मुकुंदनगर (Mukundnagar) परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला मोबाईलवरून पाच लाख रूपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी (Extortion demand and death threat) दिल्याची घटना घडली समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
शहबाज जाफर खान उर्फ बाबा खान (रा. अल्फता चौक, मुकुंदनगर) आणि शेख सादीक अल्लाबकश (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत नुरमोहम्मद आबेद शेख (वय ५०, रा. सहारासीटी, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उपोषणाला बसणार असल्याची धमकी (Bhingar Camp Police Station)
फिर्यादीचे सहारा सिटी येथे अल नुर कम्युनिटी सेंटर या हॉलचे बांधकाम सुरू आहे. यापूर्वीही संबंधित हॉलची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसिध्द करून प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्याबाबत त्यांनी यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिल्याचे नमूद केले आहे. फिर्यादीनुसार, २ सप्टेंबर रोजी पहाटे १२.२८ वाजता बाबा खान याचा फिर्यादीला मोबाईलवर फोन आला. त्यावेळी त्याने महानगरपालिकेकडे बांधकामासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार असल्याची धमकी दिली. तसेच, या भागात बांधकाम व्यवसाय करायचा असेल आणि अल नुर कम्युनिटी सेंटर चालवायचे असेल तर पाच लाख रूपये द्यावे लागतील, अन्यथा बांधकाम बंद पाडून हॉल सुरू होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
बाबा खान आणि शेख सादीक अल्लाबकश यांनी संगनमताने पाच लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच ही खंडणी भैय्या बॉक्सर उर्फ इस्माईल अशोक दरियामी याच्या सांगण्यावरून मागितली गेल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.


