
Child Marriage : नगर : महिला व बालविकास विभागाच्या (Department of Women and Child Development) सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात ११ बालविवाह (Child Marriage) थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, रोखण्यात आलेल्या बालविवाह प्रकरणी संबंधित अल्पवयीन वधू आणि वरांच्या पालकांना जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची नोटीस (Notice to file a case) बजावण्यात आलेली आहे.
अवश्य वाचा- खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रभावीपणे बालविवाह रोखण्याची कारवाई
रविवार ३ मे रोजी जिल्ह्यात मोठी लग्नतिथी होती. या दिवशी जिल्ह्यात तब्बल एकाच दिवशी ११ बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कारवाई (Child Marriage)
या कारवाईत नगर शहरात ३, अकोलेत १, राहुरी १, श्रीगोंदा १, पाथर्डी १, नेवासा १ आणि नगर तालुक्यात १, श्रीरामपूर १ असे १० बालविवाह थांबविण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


