Crime : शेतकऱ्याला मारहाण करून लघवी पाजणारा प्रतीक पाचपुते पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

0
Crime : शेतकऱ्याला मारहाण करून लघवी पाजणारा प्रतीक पाचपुते पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Crime : शेतकऱ्याला मारहाण करून लघवी पाजणारा प्रतीक पाचपुते पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Crime : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गोवंश घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला अमानुष मारहाण करत थेट लघवी पाजल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि स्वतःला गोरक्षक म्हणवून घेणारा प्रतीक पाचपुते याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अखेर ताब्यात घेतले आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात होता, ज्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

विक्रम पाचपुतेंचा रोहित पवारांवर पुन्हा निशाणा, दुखऱ्या नसेवर ठेवले बोट

काय आहे नेमकी घटना? (Crime)

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार-पिसोरे खांड रस्त्यावरून फिर्यादी शेतकरी विजय शेळके आणि टेम्पोचालक महेश जाधव हे एक गाय आणि तिचे कालवड टेम्पोतून घेऊन जात होते. यावेळी आरोपी प्रतीक पाचपुते याने त्याच्या १० ते १५ साथीदारांसह त्यांचा रस्ता अडवला. आरोपींनी केवळ गोवंश वाहतुकीचा संशय घेऊन दोन्ही पीडितांना काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपींनी पीडितांचे कपडे काढले आणि एका बाटलीत लघुशंका (लघवी) करून ती त्यांना जबरदस्तीने पाजली. एवढेच नव्हे तर, या संपूर्ण अमानुष कृत्याचे आरोपींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण (व्हिडिओ) देखील केले. मारहाण सुरू असतानाच आरोपींनी पीडित शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपींनी त्यांच्या खिशातून जबरदस्तीने २१ हजार रोख रक्कम काढून घेतली. या घटनेनंतर परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली होती.

खासगी रुग्णालयांच्या लूटीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक!

गोरक्षकाच्या बुरख्याआड दादागिरी (Crime)

मुख्य संशयित आरोपी प्रतीक पाचपुते गोरक्षणाच्या नावाखाली टोळी जमवून तो श्रीगोंदा परिसरात अशी दादागिरी आणि गुंडगिरी करत असल्याची तालुक्यात चर्चा आहे. पोलिसांची तत्परता आणि कारवाईपीडित शेतकऱ्याने हिंमत दाखवून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या अत्याचाराविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तात्काळ तपास चक्रे फिरवली. प्रतिक पाचपुते हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे असल्याच्या गोपनीय माहितीवरून पथकाने तेथे जाऊन शोध घेतला. परंतु आरोपी हा वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने सापडत नव्हता. आज (ता. १७) आरोपी शिंगवे तुकाई, ता. नेवासा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याला श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.