CSK vs LSG: स्टोइनिसचे शतक ऋतुराजवर पडलं भारी;लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

स्टोइनिसचं शतक ऋतुराज गायकवाडवर भारी पडलं आणि लखनौने ६ विकेट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला.

0
CSK vs LSG
CSK vs LSG

नगर : लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव केला. हा सामना लखनऊने सहा विकेट्सने जिंकला. या सामन्यात स्टोइनिसचं शतक ऋतुराज गायकवाड वर भारी पडलं आणि लखनऊने सामना खिशात घातला. शतकी खेळीच्या जोरावर स्टोइनिसने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

नक्की वाचा : राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट;विदर्भात गारपिटीचा इशारा

स्टोइनिसची शतकी खेळी ऋतुराजला भरली भारी (CSK vs LSG)

नाणेफेक जिंकून लखनऊने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१० धावांचं आव्हान लखनौ संघापुढे ठेवलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने ६३ चेंडूत १२४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. याशिवाय निकोलस पुरन ने ३४ धावांची खेळी केली. इतर सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकची विकेट गेली. त्यामुळे लखनौची सुरुवात डगमगली होती. मात्र, नंतर स्टोइनिसने एकाकी झुंज देत संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा : रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’;मोशन पोस्टर प्रदर्शित

ऋतुराज गायकवाड ची शतकी खेळी (CSK vs LSG)

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरजायंट्स ने पहिल्यांदा खेळताना २१० धावा केल्या. चेन्नई कडून सर्वाधिक धावा कर्णधार ऋतुराज गायकवाड ने केल्या. ऋतुराज ने ५६ चेंडूत झंझावाती शतक झळकावलं. त्याने या सामन्यात ६० चेंडूत १०८ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि तीन षटकार लगावले. ऋतुराज ला शिवम दुबे ने साथ दिली. ऋतुराजने शिवम दुबेसोबत केलेल्या १०४ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जला २१० धावांचा टप्पा गाठला.

चेन्नईचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला मात्र, त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईच्या पहिल्या दोन विकेट लवकर गेल्या. अजिंक्य रहाणे एक धावा करून बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिशेलही फक्त ११ धावा करून तंबूत परतला. ५० धावांत संघाच्या २ विकेट पडल्या होत्या. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाडने एक बाजू भक्कमपणे धरून ठेवली आणि त्यानंतर त्याला शिवम दुबेने साथ दिली. या दोघांनी लखनऊच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. रवींद्र जडेजानेही १९ चेंडूत १६ धावांचं योगदान दिलं. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांची इतकी धुलाई झाली की, त्यांनी शेवटच्या २७ चेंडूत ७६ धावा दिल्या. त्यामुळेच लखनऊने सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here