Disaster Management Plan 2026 : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

AMC : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

0
AMC : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
AMC : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

Disaster Management Plan 2026 : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (AMC) वतीने “आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६” (Disaster Management Plan 2026) अंतर्गत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा (Review of Pre-Monsoon Preparations) घेण्यासाठी मा. आयुक्त कार्यालय येथे आज दिनांक १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस सर्व प्रभाग अधिकारी, खाते प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा

यावेळी शहरात संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे, झाडे पडणे, विद्युत धोके, नालेसफाई, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, अग्निशमन विभागाची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात तत्परता ठेवून समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

AMC : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
AMC : अहिल्यानगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बचाव पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश (Disaster Management Plan 2026)

तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी नियंत्रण कक्ष, मनुष्यबळ, यंत्रसामग्री, औषधसाठा, पंपिंग व्यवस्था व बचाव पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.