Dr. Sujay Vikhe Patil | विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच पुन्हा डॉ. सुजय विखे पाटलांच्या नावाची चर्चा

0

Dr. Sujay Vikhe Patil | केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेत असलेल्या १७ रिक्त जागांची निवडणूक जाहीर केली. यात अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार पदाच्या जागेचा समावेश आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. 

हे वाचा – व्यापार्‍यांकडून बाळहिरड्याची कवडीमोल दराने खरेदी; आदिवासी शेतकऱ्यांची हमीभाव देण्याची मागणी

राजकारणाचे धडे गिरवले ( Dr. Sujay Vikhe Patil )

सुजय विखे पाटील हे दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीत राजकीय धडे गिरवलेला हा मल्ल. त्यांनी जिल्ह्यात राजकारणाचे धडे गिरवले ते काँग्रेसचे युवा नेते म्हणून. मात्र, २०१९मध्ये सुजय विखे पाटलांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले होते.

तत्कालीन आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मात्र, पूर्ववैमनस्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंना दिली नाही. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षात दाखल होत खासदार झाले. पाच वर्षांत त्यांनी दक्षिण जिल्ह्यात भरिव विकास कामे केली. मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार व खासदार पदाच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा होते.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पक्ष संघटनाकडे अधिक लक्ष ( Dr. Sujay Vikhe Patil )

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत चक्क संगमनेर मतदारसंघातून त्यांचे नाव चर्चेत होते. राहुरी विधानसभा निवडणुकीतही तोच कित्ता गिरवला गेला आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही डॉ. सुजय विखे पाटील यांच्याच नावाची चर्चा होत आहे. २०२४मधील लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सुजय विखे पाटलांनी पक्ष संघटनाकडे अधिक लक्ष दिले. कार्यकर्त्यांची मोट बांधली. आजोबांकडून शिकलेले राजकीय डाव वापरत भल्या भल्यांना पराभवाचे धक्के दिले. लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केलेल्या काहींचे राजकीय अस्थित्वच धोक्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रत्येक निवडणुकीत सुजय विखेंची राजकीय खेळी दिसून येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी भाजपमधील कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे. याच विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार असलेले अनेक जण सुजय विखेंचे निकटवर्तीय समजले जातात. भाजपकडे सर्वाधिक मतदार आहेत. ही राजकीय गणिते पाहता सुजय विखे पाटलांचे नाव चर्चेत आणल्याचे बोलले जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here