
Demand for Guaranteed Prices : अकोले : तालुक्याच्या आदिवासी भागात (Tribal Regions) सध्या बाळहिरडा (Bal Hirda) तोडण्याचे काम जोरात सुरू आहे. रखरखत्या उन्हात आदिवासी बांधव उंच झाडांवर चढून बाळहिरडा गोळा करत आहेत. यावरच आदिवासींच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, बी-बियाणे, खते आणि चार महिन्यांची मीठ-मिरची अवलंबून असते. मात्र यावर्षी शासनाकडून हमीभाव न मिळाल्याने व्यापार्यांकडून बाळहिरडा केवळ 100 रुपये किलो या कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे. त्यामुळे तातडीने सरकारने हमीभाव द्यावा, अशी मागणी (Demand for Guaranteed Prices) आदिवासी शेतकर्यांनी केली आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आदिवासी शेतकर्यांवर अन्याय
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी आंदोलन केल्यावर शासनाने 170 रुपये हमीभाव जाहीर करून बाळहिरड्याची खरेदी केली होती. नंतर खरेदी बंद केली. यावर्षी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्यामार्फत 300 ते 350 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. पण तोपर्यंत व्यापारी शेतकर्यांकडून शंभर रुपये भावाने खरेदी करत आहेत. हा सर्रास शेतकर्यांवर अन्याय होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
300 ते 350 रु. दराने खरेदीची मागणी(Demand for Guaranteed Prices)
बाळहिरडा गोळा करताना आजपर्यंत अनेकांना गंभीर दुखापत होवून अपंगत्व आले आहे, काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. तरीही शासन गंभीर नाही. त्यामुळे बाधित शेतकर्यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी आणि शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत तातडीने 300 ते 350 रुपये दराने बाळहिरडा खरेदी सुरू करावी, अशी मागणी त्यांच्यासह बाजार समितीचे संचालक तुकाराम खाडे, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, नामदेव बांडे, दिलीप भागडे, बाजीराव सगभोर, योगेश खाडे, चंदर गांगड, वसंत सोनवणे, सुनील पवार, सागर रोंगटे, मारुती खाडे, रामदास लांडगे, देविदास भागडे, अमृता झडे, तुकाराम सारुक्ते, एकनाथ सारुक्ते, दीपक भागडे, अर्जुन खोडके, निवृत्ती पोकळे आदिंनी केली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


