Election : नगर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली आहे. निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा : व्यापार्यांकडून बाळहिरड्याची कवडीमोल दराने खरेदी; आदिवासी शेतकऱ्यांची हमीभाव देण्याची मागणी
निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकीसाठी दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून दि. १ जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून दि. ४ जून ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
नक्की पहा : शेकटे शिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये दृश्य कैद
जाणून घ्या मतदार… (Election)
जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, कर्जत, अकोले, जामखेड व पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा या निवडणुकीत मतदार म्हणून समावेश आहे. एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


