Dr. Vardhman Kankariya : अहिल्यानगरच्या डॉक्टरची जागतिक स्तरावर दखल; डॉ. वर्धमान कांकरिया ठरले जगातील अव्वल नेत्रतज्ज्ञ

आंतरराष्ट्रीय योगदानासाठी डॉ. कांकरिया यांना हा सन्मान

0
Dr. Vardhman Kankariya : अहिल्यानगरच्या डॉक्टरची जागतिक स्तरावर दखल; डॉ. वर्धमान कांकरिया ठरले जगातील अव्वल नेत्रतज्ज्ञ
Dr. Vardhman Kankariya : अहिल्यानगरच्या डॉक्टरची जागतिक स्तरावर दखल; डॉ. वर्धमान कांकरिया ठरले जगातील अव्वल नेत्रतज्ज्ञ

Dr. Vardhman Kankariya : नगर : अहिल्यानगरनमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांचे चिरंजीव प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया (Dr. Vardhman Kankariya) यांची जगातील सर्वोत्तम 50 नेत्रतज्ज्ञांमध्ये (Ophthalmologist) निवड झाली आहे. डॉ. वर्धमान पुण्यात कार्यरत आहेत. त्यांनी अहिल्यानगर आणि पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. अमेरिकास्थित प्रतिष्ठित जागतिक रँकिंग प्लॅटफॉर्म (Ranking Platform) Expertscape USA ने ही मानाची यादी जाहीर केली असून, त्यात डॉ. कांकरिया यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित यादीत भारतातील अन्य नामवंत नेत्रतज्ज्ञांमध्ये दिल्लीतील AIIMSच्या प्रा. डॉ. नम्रता शर्मा आणि बंगळुरूतील डॉ. रोहित शेट्टी यांचाही समावेश आहे.

नक्की वाचा : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी;  तालुका प्रशासनाकडून आवाहन

आंतरराष्ट्रीय योगदानासाठी डॉ. कांकरिया यांना हा सन्मान

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, वैज्ञानिक प्रकाशने, शैक्षणिक प्रभाव आणि जागतिक स्तरावरील योगदान या निकषांच्या आधारे Expertscape जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांची निवड व क्रमवारी निश्चित करते. मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय योगदानासाठी डॉ. कांकरिया यांना हा सन्मान मिळाला आहे.
पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. कांकरिया हे भारतातील आघाडीचे LASIK, रोबोटिक मोतीबिंदू आणि दृष्टीदोष सुधारणा शल्यविशारद म्हणून ओळखले जातात. 2010 पासून त्यांनी नेत्रविज्ञान क्षेत्रात संशोधन, नवकल्पना आणि अत्याधुनिक उपचारपद्धतींच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद (Dr. Vardhman Kankariya)

डॉ. कांकरिया यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले आहेत. भारतात सर्वाधिक LASIK शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. तसेच, मायनस 30 डायॉप्टर इतका अत्यंत गंभीर चष्म्याचा नंबर अत्याधुनिक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीद्वारे यशस्वीरित्या सुधारण्याची उल्लेखनीय कामगिरीही त्यांनी केली आहे.

अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्राचा वाढला गौरव

भारतामध्ये रोबोटिक प्रिसिजन फेम्टोसेकंड लेझर सहाय्यित मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे ते अग्रदूत मानले जातात. जागतिक दर्जाच्या नेत्रोपचार तंत्रज्ञानाची ओळख पुणे आणि देशातील रुग्णांना करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. कांकरिया यांच्या या जागतिक यशामुळे पुणे आणि अर्थातच अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव वाढला असून, अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि नेत्रविज्ञान क्षेत्रातील उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख आणखी भक्कम झाली असून याचा अहिल्यानगरकरांनाही अभिमान आहे.