MPSC Exam : आता MPSC परीक्षेचे नियम झाले कडक; कारण नेमकं काय?

0
MPSC Exam : आता MPSC परीक्षेचे नियम झाले कडक; कारण नेमकं काय?
MPSC Exam : आता MPSC परीक्षेचे नियम झाले कडक; कारण नेमकं काय?

नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exam) नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये एका दिवसात उत्तर तालिका जाहीर करण्याचा नवा रेकॉर्ड आयोगाने केला. त्यानंतर एमपीएससीने एक धडाकेबाज निर्णय घेतलाय. रविवारी १४ जून, २०२६ ला नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने नियम थोडे कठोर केले (The Commission has tightened the rules) आहेत. एमपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर आता उमेदवारांना हे नियम (Rules) पाळावेच लागणार आहेत. आता आयोगाची ही नियमावली काय आहे ते पाहूया.

नक्की वाचा : गरजू रुग्णांसाठी आमदार अमोल खताळ ठरले आधार

बदललेले नियम काय? (MPSC Exam)

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. परीक्षा कक्षात म्हणजेच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांना परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही.

अवश्य वाचा: आमिष दाखवून वृद्ध महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आयोगाने नियम का बदलले? (MPSC Exam)

परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उप केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य असेल. तसेच, MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेपर सुरु होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहावे लागेल. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी ठरवलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या,अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन आयोगाने हे नियम बदललेले आहेत.