Eco-friendly Diwali : पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता!

0

Eco-friendly Diwali : अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्शिअल हायस्कूल (Residential High School), अहिल्यानगर येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पर्यावरणपूरक दिवाळी साजरा (Eco-friendly Diwali) करत आकाशकंदील, मातीच्या पणत्या व भेटकार्ड बनविण्याची कार्यशाळा आणि स्पर्धा उत्साहात आयोजित करण्यात आली.

Eco-friendly Diwali : पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता!
Eco-friendly Diwali : पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता!

कलात्मकतेला या उपक्रमातून व्यासपीठ

दिवाळीचा सण आनंदाने साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशील कलाकृतींतून दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक आकाशकंदील, मातीच्या पणत्या आणि सुंदर भेटकार्डे तयार केली. त्यांच्या कल्पकतेला आणि कलात्मकतेला या उपक्रमातून व्यासपीठ मिळाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या विद्यार्थ्यांनी मिळविला क्रमांक (Eco-friendly Diwali)

आकाशकंदील बनवा स्पर्धेच्या पाचवी-सहावी गटात राम अडागळे याने प्रथम, सिद्धी देवकर हिने द्वितीय, अदिती माने हिने तृतीय, तर अक्षरा भालेराव हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. सातवी-आठवी गटात सोहम साठे याने प्रथम, परिणीता कांबळे हिने द्वितीय, समीक्षा लोंढे हिने तृतीय, तर सम्राज्ञी टेमकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

Eco-friendly Diwali : पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता!
Eco-friendly Diwali : पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता!

पणती व ग्रीटिंग कार्ड बनवा स्पर्धेत प्रांजली होळकर हिने प्रथम, आदित्य आव्हाड याने द्वितीय, वेदिका शिंदे हिने तृतीय, तर अपूर्वा कुलकर्णी हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

प्राचार्य व्ही. व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विजेत्यांचे उपमुख्याध्यापक श्री. पवार, पर्यवेक्षक श्री. म्हस्के, श्री. सोनवणे, सौ. मरकड व ज्येष्ठ शिक्षक महावीर नारळे यांनी अभिनंदन केले. कलाशिक्षक सचिन सांगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.