Fraud : कर्जत : कुंभेफळ (ता.कर्जत) येथील शेतजमीनीचा विना नोंदणीकृत बनावट साठेखत करार (Agreement to sell) तयार करून तो दस्तऐवज खरा असल्याप्रमाणे वापरत दोन महिलांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप शिवदास पाटील, महेंद्र शांतीलाल धोदाड आणि विजय सुनिल पाटील या तिघां विरोधात पूनम हिरालाल गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली.
नक्की वाचा : मनपाचा प्रारुप सुधारित विकास आराखडा जाहीर; 420 हेक्टर क्षेत्रावर 519 आरक्षणे
८१ आर जमिनीवर डोळा
मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२५ मध्ये ॲड. संदीप शिवदास पाटील यांच्याकडून फिर्यादी पूनम गायकवाड यांनी उसने म्हणून दोन लाख रुपये मागितले. त्यानुसार ॲड. संदीप पाटील यांनी फोन पे वर ही रक्कम जमा देखील केली. मात्र ती उसने घेतलेली दोन लाख रुपयांची रक्कम फिर्यादी गायकवाड यांनी आपल्या पती देखत एक महिन्याच्या आत रोख स्वरूपात ॲड संदीप पाटील यांना परत केली. या काळात फिर्यादीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सामाईकातील क्षेत्र चार सहहिस्सेदार यांच्या संमतीने १ एप्रिल २०२६ रोजी रजिस्टर वाटप पत्र झाले. त्यातील एकूण ८१ आर जमीन पूनम गायकवाड व बहीण वृषाली योगेश सराटे यांच्या हिश्यास वाटप-पत्राने आली. या ८१ आर जमिनीवर ॲड संदीप पाटील यांचा डोळा होता. व त्यासाठी ते गायकवाड यांना सतत आग्रह धरत होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दावा दाखल करणार असल्याची धमकी (Fraud)
वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी फिर्यादीच्या आई-वडील आणि भावास त्रास दिला असल्याने त्यांनी विक्री जमीन करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ४ मे २०२६ ला गायकवाड आणि सराटे यांनी आपली ८१ आर जमीन स्वखुशीने चरपटीनाथ पांडुरंग धोदाड यांना रीतसर कायदेशीर अधिकाराने रजिस्टर नोंदणीकृत खरेदीखताने विक्री केली. त्याचाच राग मनात धरून १४ मे ला रात्री ११ च्या सुमारास संदीप शिवदास पाटील, महेंद्र शांतीलाल धोदाड व इतर दोन अज्ञात व्यक्ती यांनी घरासमोर येत तुम्ही आम्हाला जमीन न देता चरपटीनाथ धोदाड यांना का विकली ? अशी विचारणा करीत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गेल्या वर्षी तुमच्या खात्यावर दोन लाख रुपये ऑनलाइन पाठविले आहेत. त्यावरून मी तुमच्यावर दावा दाखल करणार असल्याची धमकी दिली.
दोन्ही बहिणींना २२ लाख रुपये देण्याची बेकायदेशीर मागणी
यापूर्वीच दोन लाख रुपये रोख स्वरुपात परत दिलेले असताना कायदेशीर कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून फिर्यादीने पुन्हा १५ मे ला बँक खात्यातून संदीप पाटील यांच्या मोबाईल क्रमांक असलेल्या फोन पे वर ऑनलाइन पाठवले. तरी देखील संदीप पाटील याने महेंद्र शांतिलाल धोदाड व विजय सुनील पाटील यांच्याशी आपापसात संगनमत करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने वडिलोपार्जित जमीन बळकावण्याच्या व बेकायदेशीर आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने संमतीशिवाय कोणतीही पूर्वकल्पना न देता या जमिनीची बनावट साठेखत करारनामा तयार केला. तो खरा असल्याचे भासवत त्या आधारे वकीलामार्फत दोन्ही बहिणींना २२ लाख रुपये देण्याची बेकायदेशीर मागणी केली. तसेच जमीन त्यांच्या नावावर न केल्यास आमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची व जमीन बळकावण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.



