Gang-rape of a young woman : पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Gang-rape of a young woman : पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Gang-rape of a young woman : पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gang-rape of a young woman : पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Gang-rape of a young woman : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील देवगाव येथे पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर दोन तरूणांनी दुचाकीवरून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार (Gang-rape of a young woman) केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत युवतीच्या सोबत असलेल्या युवकालाही दोघांनी मारहाण (Youth assaulted) केली. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या दोन तरूणांनी पीडित युवतीची व तिच्या मानलेल्या भावाची सुटका केली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) दोन संशयितांविरूध्द बुधवारी (ता. १६) पहाटे गुन्हा दाखल केला आहे.

पीडित युवतीने दिली फिर्याद

पीडित युवतीने (वय २२) फिर्याद दिली आहे. फिर्यादी युवती अहिल्यानगर शहरात खासगी नोकरी करते. ती शहरात भाड्याच्या खोलीत राहते. तिच्यासोबत काम करणारा २० वर्षीय युवक हा तिचा मानलेला भाऊ असून तो नाशिकचा असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्यात आले(Gang-rape of a young woman)

फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ड्यूटीवरून सुटल्यानंतर फिर्यादी व तिचा मानलेला भाऊ दुचाकीवरून देवगाव परिसरात पवनचक्की पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते देवदरी हॉटेलसमोरील एका पवनचक्कीजवळ गेले. तेथे ते पवनचक्की पाहत असताना सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून दोन तरूण तेथे आले. त्यांनी त्या ठिकाणी येण्याबाबत विचारणा करून युवती व तिच्या सोबतच्या युवकाला शिवीगाळ केले. त्यानंतर एका तरूणाने युवतीला त्यांच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर तिच्या सोबतच्या युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्यात आले, तर दुसर्‍या तरूणाने तिच्या सोबतच्या युवकाला त्याच्या दुचाकीवर बसवून घेतले.

दोन्ही दुचाकी अहिल्यानगर रोडने घाटाच्या दिशेने नेण्यात आल्या. त्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या कमानीतून कच्च्या रस्त्याने निर्जन भागात नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तेथे युवतीने त्यांना आपण काय चूक केली, असे विचारून सोडून देण्याची विनंती केली. मात्र, तिच्या सोबतच्या युवकानेही त्यांना सोडण्याची विनंती केली असता त्याला पुन्हा मारहाण केली. दोघांचे मोबाईल हिसकावून घेतले. तसेच दोघांनी तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पीडिता व तिच्यासोबतचा युवक आरडाओरड करत असताना तेथे एक तरूण आला. त्याने दोघांना असे कृत्य करू नका, असे सांगितले. मात्र, संशयितांनी त्यालाही तेथून जाण्यास सांगितले.

काही वेळाने तो तरूण आणखी एका साथीदारासह पुन्हा घटनास्थळी आला. त्यांनी पीडित युवती व तिच्या सोबतच्या युवकाची सुटका केली. त्यानंतर संशयित दोघे मोबाईल परत देऊन दुचाकीवरून तेथून पसार झाले. मदतीला आलेल्या तरूणांनी पीडितेला धीर देत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पीडित युवतीला धीर देत फिर्याद नोंदवून घेतली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे अधिक तपास करीत आहेत.

संशयित दोघे गजाआड
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी शोध मोहिम राबवित संशयित दोघांना ताब्यात घेतले. संदेश गोरक्षनाथ शिंदे आणि मोहित अशोक खळे (दोघे रा. देवगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची (ता. २१) पोलीस कोठडी दिली आहे.