SS Retail Limited IPO : एसएस रिटेलचा आयपीओ खुला, अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद; १४६ कोटींची गुंतवणूक

एसएस रिटेलचा 500 कोटींचा आयपीओ

0
SS Retail Limited IPO : एसएस रिटेलचा आयपीओ खुला, अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद; १४६ कोटींची गुंतवणूक
SS Retail Limited IPO : एसएस रिटेलचा आयपीओ खुला, अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद; १४६ कोटींची गुंतवणूक

SS Retail Limited IPO : नगर : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा SS Retail चा आयपीओ (SS Retail Limited IPO) आज (ता. 16) पासून खुला झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी (Investor) गुंतवणुकीची एक चांगली संधी घेऊन आला आहे. जर तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आयपीओमध्ये 18 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे.  सध्या या आयपीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. माहितीनुसार, कंपनीने आयपीओपूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे 146 कोटी उभारले असून, देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा यात मोठा सहभाग आहे.

नक्की वाचा : एक गाव, एक गणपती’ला यंदा मर्यादित प्रतिसाद; २५५ गावांतच उपक्रम

2026 मध्ये कंपनीचा महसूल सुमारे 2,351 कोटी रुपये

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अँकर बुकमध्ये SBI Mutual Fund, ICICI Prudential Mutual Fund, Kotak Mahindra AMC, Axis Mutual Fund, WhiteOak Capital, Motilal Oswal AMC, Invesco आणि Aditya Birla Sun Life AMC यांसह 11 देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी सहभाग घेतला. या फंडांनी अँकर बुकमधील सुमारे 83.14% शेअर्स घेतले आहे.SS Retail ही मोबाईल फोन, अ‍ॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मल्टी-ब्रँड रिटेल चेन आहे. कंपनीचे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये 536 स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल सुमारे 2,351 कोटी रुपये होता तर नफा सुमारे 59.8 कोटी होता.

कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओमधून मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे 241.3 कोटी भांडवलसाठी आणि सुमारे 12.4 कोटी नवीन स्टोअर्सच्या फिट आऊट खर्चासाठी वापरण्याचे नियोजन आहे. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एसएस रिटेलचा 500 कोटींचा आयपीओ (SS Retail Limited IPO)

-एकूण आयपीओ: 500 कोटी
-नवीन शेअर विक्री: 360 कोटी
-शेअर विक्रीतून निधी: ₹140 कोटी
– शेअरची किंमत: 403 ते 424
– एका लॉटमध्ये: 35 शेअर
-किमान गुंतवणूक: 14,840
– आयपीओची मुदत: 16 ते 18 सप्टेंबर 2026
– संभाव्य शेअर बाजारातील नोंदणी: 23 सप्टेंबर 2026

किमान एका लॉटसाठी 35 शेअर घ्यावे लागतील. कमाल किंमत 424 धरल्यास एका लॉटसाठी 14,840 गुंतवावे लागतील.