नगर: “जर तुम्हीही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाणार असाल, तर सावधान! केडगावची ही घटना तुमचे डोळे उघडेल.” केडगाव (Kedgaon Crime) उपनगरातील श्रेया गार्डन येथे शनिवारी २ मे ला रात्री एका साखरपुडा समारंभात (Engagement Ceremony) सुमारे १६ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना (Incident of jewelry theft) घडली आहे. याप्रकरणी सिंधु महेश माने (वय ५२, रा. तिसगाव ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?
नेमकं घडलं काय? (Kedgaon Crime)
सिंधु माने या शिक्षिका असून पतीसोबत त्या शनिवारी सायंकाळी केडगाव येथे भाच्याच्या साखरपुड्याला गेल्या होत्या. त्यांनी एका कापडी पिशवीत विविध सोन्याचे दागिने ठेवले होते. कार्यक्रम सुरू असताना रात्री पावणेआठच्या दरम्यान त्या आपल्या नातेवाइकांसोबत स्टेजवर फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी दागिन्यांची पिशवी पायाजवळ ठेवली होती. मात्र त्याचवेळी अचानक लाईट गेल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पिशवी उचलण्यासाठी त्या खाली वाकल्यावर त्यांना ती पिशवी तेथे आढळून आली नाही. यानंतर त्यांनी नातेवाइकांसह सगळीकडे दागिन्यांचा शोध घेतला.
मात्र, त्यांना ते दागिने सापडले नाहीत. या दागिन्यांमध्ये ४ तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस, ६ तोळ्यांची मोहनमाळ, ६ तोळ्यांचे गंठण तसेच अर्धा तोळ्याची पिळ्याची अंगठी यांचा समावेश होता. म्हणजेच एकूण १६ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सुमारे ७ लाख ४२ लाख रुपये किमतीचे हे दागिने होते. या अज्ञात चोरट्याने लाईट गेल्याची संधी साधून पिशवीसह दागिने चोरी केल्याची खात्री झाली. या घटनेनंतर माने व नातेवाइकांनी कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा: जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
आता अशा घटना घडत असतील तर आपल्याला सुद्धा सतर्क राहणे गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना सोन्याचे दागिने सोबत नेणं टाळाच…



