Chakankar : नगर : नाशिक येथील भोंदू आशोक खरात मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याला समन्स पाठविले आहे. त्यांना पुढील आठवड्यात मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच ज्या पतसंस्थेतील खात्यांवरून ही चौकशी होत आहे, त्या समता नागरी सहकारी पतसंस्थेचीही चौकशी होणार आहे.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यात चाललंय काय?; आता चाकणमध्ये मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
७० कोटीचे व्यवहार
या पतसंस्थेत असलेल्या खात्यातून ७० कोटी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. त्यासंबंधी ईडीला चौकशी करायची आहे. चाकणकर यांची यापूर्वी शिर्डी पोलिस ठाण्यात चौकशी झाली. तेव्हा त्यांनी या खात्यांबद्दल आणि त्यातील व्यवहारांबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले होते. कागदपत्रांचा गैरवापर करून ही खाती उघडल्याचे त्यांचे म्हणने आहे.
नक्की पहा : विवेक कोल्हेंचा मिशीला पीळ अन् पुष्पा स्टाईल
कोयटे यांचीही चौकशी (Chakankar)
ईडी आता समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांचीही चौकशी करणार आहे. एकाच मोबाईल नंबरवर आणि नॉमिनीवर अनेक खाती उघडली कशी उघडली गेली, यासंबंधी पतसंस्थेने ‘रेड फ्लॅग’ प्रणाली का लागू केली नाही? याबाबत ED कोयटे यांच्याकडे चौकशी करणार आहे.



