
नगर : पुण्याच्या (Pune Crime) केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात (Ketan Agrawal Murder Case) अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. आधी सर्वांना अपघाती मृत्यू वाटणाऱ्या प्रकरणात होणाऱ्या नवऱ्याचा बॉयफ्रेंडसोबत मिळून काटा काढणाऱ्या सिया गोयल (Siya Goyal) हिचं पितळ उघडलं पडलं. केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं ४०० फूट खोल दरीत ढकलून दिलं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला.
नक्की वाचा : १ जुलैपासून खिशाला कात्री; रेल्वे तिकिटांपासून LPG पर्यंत बदलणार ७ नियम
प्रत्यक्ष हत्येच्या चार दिवस आधीच, सिया गोयलनं केतनला दरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मारण्यासाठीचा तो प्लॅन A होता. जेव्हा प्लॅन A अयशस्वी ठरला, तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनं प्लॅन B आखला. इतकंच नाही तर, तो प्लॅनही फसला असता तर काय करायचं? यासाठी सियानं आधीच प्लॅन C देखील तयार ठेवला होता.
केतनला मारण्यासाठीचा प्लॅन A काय होता? (Ketan Agrawal Murder Case)

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे, ते म्हणाले की, सिया आणि केतन यांनी लोहगड किल्ल्याला तीन वेळा भेट दिली होती. १४ जूनला म्हणजेच हत्येच्या चार दिवस आधी, सिया केतनला लोणावळा येथील लोहगडावर घेऊन गेली. हा तिच्या कटाचा प्लॅन A होता. याच भेटीदरम्यान सियानं केतनचा जीव घेण्याचा पहिला प्रयत्न केला. तिनं त्याला किल्ल्यावरून दरीच्या दिशेने ढकललं. पण, केतनने एका झुडपाला पकडलं आणि त्याचे प्राण वाचले. आपलं गुपित उघड होण्याच्या भीतीने सिया चलाखीनं “साप! साप!” असं ओरडली आणि तिने केतनला जाऊन मिठी मारली. केतनला वाटलं की, तिथे खरोखरंच साप होता आणि सापापासून वाचवण्यासाठीच सियानं त्याला ढकललं होतं.
अवश्य वाचा : लग्नपत्रिकेवर आता वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार
सियाचा प्लॅन B सक्सेसफुल? (Ketan Agrawal Murder Case)
अग्रवालच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्याच्या एक दिवस आधीच सियानं प्री-बर्थडे सरप्राइजच्या निमित्ताने केतन अग्रवालला लोणावळ्यातील लोहगढ किल्ल्यावर नेलं. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर होते, त्याचवेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी सुद्धा तिथे उपस्थित होता. चेतननं त्याचा मोबाईल कोंढवामधील आपल्या घरी ठेवला. तसेच, त्याच्या मोबाइलचं इंटरनेट सकाळपासून बंद होतं. त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घातली आणि चेहरा पूर्णपणे लपला जाईल, याची काळजी घेतली. चौकशीदरम्यान, एवढ्या भर उन्हात हुडी कोण घालतं? असा संशय पोलिसांना आला आणि तिथेच सिया आणि चेतननं रचलेला मोठा कट फसला. हुडी घालून गडावर जातानाचा चेतनचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

लोहगडावर केतन आपल्या मोबाईलनं फोटो काढत असतानाच सियाने त्याला दरीत ढकललं. त्यानंतर तिनं पोलिसांना फोन करुन सांगितलं की, केतनचा पाय घसरलाय आणि तो खाली पडला. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. सर्वांना अपघाती मृत्यू वाटला आणि सिया गोयलचा प्लॅन B यशस्वी झाला.
सियाचा प्लॅन C सुद्धा तयार केतनच्या वडिलांचा आरोप आहे की, सियानं त्यांच्या मुलाच्या हत्येचा मोठा कट रचला होता. जर लोहगडावर प्लॅन B यशस्वी झाला नसता, तर महाबळेश्वरमध्ये केतनचा जीव घेण्याचा सियाचा इरादा होता. तिनं चेतनच्या मदतीनं आधीच प्लॅन C सुद्धा तयार करून ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दोघांचं लग्न ठरलेलं होते. त्यानंतर साखरपुडाही ठरला होता. पण, त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी क्राइम ब्रांच आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास करुन प्रकरणाचा छडा लावला.


