Leopard : अकोले: कोंबडीचा पाठलाग करत तिची शिकार करण्यासाठी बिबट्या (Leopard) थेट शेतकर्याच्या घराजवळील अंगणात शिरला. ही घटना डोंगरगाव (ता.अकोले (Akole)) परिसरात घडली. बिबट्याच्या दहशतीमुळे (Terror) परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल
बिबट्याचा शिकारीविना नजीकच्या शेतात पोबारा
आढळा विभागातील गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव, वीरगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. दिवसाढवळ्या बिबट्या लोकांना दिसू लागला आहे. पशुधनावरही भरदिवसा हल्ले करत आहे. त्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी तर भरदुपारी डोंगरगाव येथील राजेंद्र उगले यांच्या घराच्या अंगणात बिबट्या कोंबडीच्या मागे धावला. यावेळी महिला अंगणात बसलेल्या होत्या. बिबट्याचे हे दृश्य पाहताच उपस्थितांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तेथून शिकारीविना नजीकच्या शेतात पोबारा केला.
अवश्य वाचा : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी (Leopard)
त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, कार्याध्यक्ष संतोष उगले, युवक अध्यक्ष शुभम आंबरे, उपाध्यक्ष सुनील पुंडे, सोमनाथ आहेर, माऊली आहेर, दत्तात्रेय आहेर, प्रवीण आहेर, सुनील उगले, राजेंद्र उगले आदिंनी केली आहे.