
Local Crime Branch : नगर : संगमनेर शहर परिसरात गोमांस विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई (Action) केली. या कारवाईत चार जणांना ताब्यात (In custody) घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे १ हजार ७०० किलो गोमांस आणि पिकअप वाहन असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अब्दुलहमीद अहमद कुरेशी (वय २३, रा. जमजम कॉलनी, संगमनेर), कलामुद्दीन मिज्जन खान (वय २८, रा. हावडा ब्रीज, संगमनेर, मूळ रा. बहरीच, उत्तर प्रदेश), वाहनचालक अरबाज फिरोज खान (वय २४, रा. सिद्धार्थनगर, शिरूर, जि. पुणे) आणि कैश शबनूर इनामदार (वय २३, रा. संजयनगर, श्रीरामपूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : साखरेच्या दरात घसरण, पण ग्राहकांसाठी महागच
अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे यांच्यासह पोलिसांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत होते. शनिवारी (ता.५) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाला गोपनीय माहिती मिळाली. जमजम कॉलनी परिसरातील एका शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस पिकअप वाहनातून विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच हे वाहन सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावर असिफ शेख यांच्या कांद्याच्या चाळीजवळ थांबले असल्याचे समोर आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch)
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळले. या कारवाईत अब्दुलहमीद अहमद कुरेशी (वय २३, रा. जमजम कॉलनी, संगमनेर), कलामुद्दीन मिज्जन खान (वय २८, रा. हावडा ब्रीज, संगमनेर, मूळ रा. बहरीच, उत्तर प्रदेश), वाहनचालक अरबाज फिरोज खान (वय २४, रा. सिद्धार्थनगर, शिरूर, जि. पुणे) आणि कैश शबनूर इनामदार (वय २३, रा. संजयनगर, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ५ लाख १० हजार रुपये किमतीचे अंदाजे १,७०० किलो गोमांस तसेच ६ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल डोके, अमृत आढाव, योगेश कर्डीले व भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.


