Sugar : नगर : गेल्या महिन्यात वाढलेले साखरेच (Sugar) दर सरकारच्या हस्तक्षेपामुळे 30 टक्क्यांनी खाली आले आहेत. मात्र, कारखान्यांतून विकल्या जाणाऱ्या साखरेचे दर (Rate) कमी झाले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना (Consumer) मिळणाऱ्या साखरेचे दर अद्याप फारसे कमी झाले नाहीत.
नक्की वाचा : प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
साठेबाजी रोखण्यासाठी कडक नियम
राज्यात सध्या कारखान्यांतून विकल्या (एक्स-मिल) जाणाऱ्या साखरेचे दर प्रति क्विंटल सुमारे ४,७००, ५,१०० रुपये (म्हणजेच ४७ ते ५१ प्रति किलो) पर्यंत खाली आले आहेत. ऑगस्ट महिन्यात साखरेचे हेच दर वाढून प्रति किलो सुमारे ६,५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातही साखरेच दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप केला. कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. साठेबाजी रोखण्यासाठी नियम कडक केले. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. कच्ची साखर येण्याच्या आधीच बाजारातील साखरेच दर कमी झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अद्याप साखरेचे दर 60 ते 63 रुपये (Sugar)
कारखान्यांतून साखर बऱ्यापैकी स्वस्त झाली असली तरी, सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचताना किरकोळ बाजारात अद्याप साखरेचे दर 60 ते 63 रुपये किलो आहे. कारखान्यांचे दर कमी झाले तरी त्याचा प्रत्यक्ष ग्राहकांना अद्याप फायदा झालेला नाही. कच्ची साखर येऊन तिच्यावर प्रक्रिया होऊन ती बाजारात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या दर कमी होण्यास साठेबाजी रोखण्यासाठी केलेले उपाय हेच कारण असल्याचे मानले जात आहे. याचा अर्थ मधल्या काळात झालेली दरवाढी कृत्रिम होती, साठेबाजेतून ती झाली होती, असा संशय आता व्यक्त केला जाऊ लागला आहे.



