नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आमरण उपोषण आज दहाव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबतही शंका (Doubts regarding death in a plane crash) व्यक्त करत या घटनेच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरच्या ५७५ तरुणांना अनाथ प्रमाणपत्र; यशाचे दार उघडले!
एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? (Manoj Jarange Patil)
अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करताना जरांगे पाटील भावुक झाले होते. ते यावेळी म्हणाले की, “अजितदादांचं कोणासोबत शत्रुत्व नव्हतं. एवढा मोठा माणूस असा मरत असतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे आणि अभ्यासू नेतृत्व होते. त्यांनी राज्यासाठी आणि देशासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे अशा नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : ‘धर्मवीर गड’ आता राज्य संरक्षित स्मारक घोषित; राज्यसरकारचा निर्णय
‘अजितदादांच्या मृत्यूबाबतची संपूर्ण माहिती जनतेसमोर यायला हवी’ (Manoj Jarange Patil)
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपास यंत्रणांकडून विविध पातळ्यांवर तपास करण्यात येत आहे. विमानाच्या तांत्रिक स्थितीपासून ते उड्डाणाच्या परिस्थितीपर्यंत विविध बाबी तपासाचा भाग आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती, फ्लाइट डेटा आणि कॉकपिटमधील संभाषण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मात्र, अजितदादांच्या मृत्यूबाबतची संपूर्ण आणि अंतिम माहिती जनतेसमोर स्पष्टपणे यायला हवी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करण्यापेक्षा या घटनेचा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून केवळ आश्वासने, बैठका आणि चर्चांच्या माध्यमातून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाज आता सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही; निर्णय हवा आणि त्याची अंमलबजावणी हवी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.



