Nilwande Dam : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

Nilwande Dam : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

0
Nilwande Dam : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार
Nilwande Dam : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

Nilwande Dam : नगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) लाभक्षेत्रातील उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळणार आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज

पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन निर्णय

उन्हाची वाढती तीव्रता, लाभक्षेत्रातील गावांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा लाभ मिळावा, ही मागणी पालकमंत्र्यांनी संवेदनशीलतेने मान्य केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Nilwande Dam)

यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.