Sangamner : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ चा प्रारंभ

Sangamner : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६ चा शुभारंभ

0
Sangamner : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६ चा शुभारंभ
Sangamner : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६ चा शुभारंभ

Sangamner : नगर : संगमनेर येथे आज (ता. १५) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन (गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांच्या पुढाकाराने तसेच उर्ध्व प्रवरा कालवा विभाग, जलसंपदा विभाग संगमनेर यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा – २०२६ चा उद्घाटन समारंभ पार पडला.

हेही वाचा : RTE मध्ये अर्ज केलेल्या पालकांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी करावी लागते तासनतास प्रतीक्षा 

महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन

यावेळी आमदार अमोल खताळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी बचत, जल पुनर्भरण, शेतकरी व पाणी वापर संस्थांसोबत संवाद, तसेच सिंचन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून पाणी वापराचे योग्य नियोजन, उत्पादकता वाढ, कालवा व धरण स्वच्छता, नदी प्रदूषण नियंत्रण, तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन आणि कृती आराखडा राबविण्यात येईल.

नक्की पहा : व्याख्यानाच्या कार्यक्रमात डीजेचा खोडा; संगमनेरमध्ये राडा

जलजागृतीचा संदेश (Sangamner)

२५ ते २९ एप्रिल दरम्यान गोदावरी ते नर्मदा जलदिंडी आयोजित करण्यात येणार असून, जलजागृतीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार आणि या उपक्रमाचा समारोप होणार आहे.