Rahata News : RTE मध्ये अर्ज केलेल्या पालकांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी करावी लागते तासनतास प्रतीक्षा 

Rahata News : RTE मध्ये अर्ज केलेल्या पालकांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी करावी लागते तासनतास प्रतीक्षा 

0
Rahata News : RTE मध्ये अर्ज केलेल्या पालकांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी करावी लागते तासनतास प्रतीक्षा
Rahata News : RTE मध्ये अर्ज केलेल्या पालकांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी करावी लागते तासनतास प्रतीक्षा

Rahata News : राहाता :  दरवर्षी ६ वर्ष पूर्ण झालेल्या गरीब बालकांना नामांकित खाजगी शाळेमध्ये (Private School) मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून  ऑनलाइन अर्ज (Online Application) मागवले जातात. शासन खाजगी शाळेतील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवून त्यांची प्रवेश फीस शासन संस्थेला अदा करत असते. त्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागातील (Education Department) गटशिक्षणाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये स्वत: गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व खाजगी शाळेतील संस्था प्रतीनीधी असतात.

नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन

गटशिक्षणाधिकारी यांची भुमिका अतिशय महत्वाची

ही समिती विहीत मुदतीत निवड झालेले लाभार्थी व त्यांनी जोडलेली कागदपत्रे यांची सखोल तपासणी करून निर्णय घेत असते. यामध्ये अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी यांची भुमिका अतिशय महत्वाची असते. सामान्यातील सामान्य उत्पन्न गटातील बालके, दुर्बल घटकातील बालके, विशेष गरजाअसणारे म्हणजेच दिव्यांग बालके, विधुर विधवा, घटस्फोटीत, एकल महीलांची बालके यातून अल्पातील अल्प उत्पन्न गटातील सामान्य जनतेच्या बालकांची निवड होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांची असते. मात्र, राहाता तालुक्यातील बालके व पालक त्यांच्या प्रवेशासाठी तासंतास गटशिक्षणाधिकारी येण्याची व प्रवेश कार्यालयाचे कुलूप उघडण्याची वाट बघताना दिसत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तालुक्यातील कानाकोप-यातून पालक जमलेले (Rahata News)

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव म्हणाले की, आरटीई मध्ये नंबर लागलेल्या पालकांना शासनाच्या नियमावली प्रमाणे मूळ कागदपत्र जमा करण्यासाठी सकाळी १० वाजता पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता या  दोन ठिकाणी अर्ज पडताळणीसाठी पालकांना बोलवले होते. भल्या सकाळीच आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल यासाठी तालुक्यातील कानाकोप-यातून पालक जमलेले होते. सकाळी ९ वाजल्यापासून अर्ज पडताळणी सुरु होण्याची शक्यता होती म्हणून पालक पंचायत समितीमध्ये आले होते. ऐनवेळी त्यांना जिल्हा परिषद शाळा राहाता येथे जाण्यास शिक्षण विभागातील अधिकारी सांगत होते. मात्र, गटशिक्षणाधिकारी तेथे नव्हते.

११.३० वाजेपर्यंत कोणताही अधिकारी नव्हता

पालक जिल्हा परिषद शाळा राहाता येथे अर्ज पडताळणी करण्यासाठी आले असता त्या ठिकाणी कोणताही अधिकारी वेळेत उपस्थित नव्हता. समितीत साधारणतः वीस सदस्य असतात त्यातील कोणीही तेथे उपस्थित नव्हते. ही घटना आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहचलो असता येथे ११.३० वाजेपर्यंत कोणताही अधिकारी नव्हता. गटशिक्षणाधिकारी यांना पालकांनी फोन केला असता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित उत्तर दिली नाही. वारंवार फोन केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी १२:३० वाजता एका  शिक्षकाला तेथे पाठवले. 

कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही

त्यानंतर काम सुरू झाले.त्यांनाही याबाबत योग्य माहीत नव्हती. कारण ते देखील शिक्षक एका जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांना कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. काहीही विचारले तर ते साहेबांना विचारा एवढेच सांगत होते. अशा भोंगळ कामकाज करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे नेमके करायचे काय? असाच मनस्ताप पालकांनी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

कागद पडताळणीची शेवटची तारीख २० एप्रिल

आर.टी.ई.प्रवेश मूळ कागद पडताळणीची शेवटची तारीख २० एप्रिल असून त्यात  सरकारी सुट्टी असल्याने याचा फटका पालकांना व विद्यार्थ्यांना बसेल त्यामुळे ही व्यवस्था सुरळीत केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र निवडणूक निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या राहाता येथील शिक्षण विभागात प्रभारीवर प्रभारीराज चालू आहे .

गटशिक्षणाधिकारी हे देखील प्रभारी नेमलेले

गटशिक्षणाधिकारी हेदेखील प्रभारी नेमलेले आहे ते इतर तालुक्यातील विस्तार अधिकारी असुन राहाता तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज बघत आहेत.त्यांची मुळ ही  नेमणूक दुसऱ्या तालुक्यातील आहे. आज पॅट मूल्यांकन चाचणी  महाराष्ट्रभर एकाचवेळी व एकाच दिवशी आहे.ही परीक्षा व विद्यार्थी वा-यावर सोडून जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांना ऐनवेळी आर.टी.ई.प्रवेश पडताळणीसाठी पाठविण्यात आले.

शिक्षक शालेय कामकाज सोडून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे समजते

परीक्षा सोडून हे शिक्षक आर.टी.ई.प्रवेशाचे कामकाज कसे करू शकतात? त्यांना परीक्षेसाठी नेमले नव्हते का ? हा प्रश्न देखील खुप गंभीर आहे. त्यातील एक शिक्षक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकुरी येथे उपाध्यापक पदावर काम करतात तर दुसरे शिक्षक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर या उपाध्यापक पदावर काम करतात. पंचायत समिती शिक्षण विभागात देखील काही शिक्षक शालेय कामकाज सोडून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे समजते.