Pathardi : चितळवाडीत ग्रामसभा न झाल्याची तक्रार; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0
Pathardi : चितळवाडीत ग्रामसभा न झाल्याची तक्रार; गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
Pathardi : चितळवाडीत ग्रामसभा न झाल्याची तक्रार; गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

Pathardi : नगर : पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी कोठेवाडी ग्रामपंचायतीत गेल्या १ मे रोजी नियोजित ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत ग्रामस्थ बाबासाहेब गायके यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ग्रामसभा तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

हेही वाचा : पोलीस निरीक्षक जयेश गांगुर्डे गजाआड; एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण

ग्रामसभा घेणे बंधनकारक

निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना चितळवाडी कोठेवाडी येथे ग्रामसभा झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामसभेमध्ये गावातील विकासकामे, निधी खर्च, विविध योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या जातात. मात्र, ग्रामसभा न झाल्याने नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी व्यासपीठ मिळाले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

नक्की पहा : अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत

माहिती अधिकारात मागवला तपशील (Pathardi)

बाबासाहेब गायके यांनी माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र माहिती अर्जही दाखल केला आहे. या अर्जामध्ये मागील पाच वर्षांतील ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा संपूर्ण आर्थिक तपशील मागितला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीला विविध योजनांमधून प्राप्त झालेला निधी, खर्च करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती, मंजूर व प्रत्यक्ष खर्च रक्कम, संबंधित ठेकेदारांची नावे, खर्च न झाल्याने परत गेलेला निधी, तसेच प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहिलेल्या निधीचा तपशील मागविला आहे. सदर माहिती प्रमाणित प्रतींसह ३० दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.