Rahul Gandhi :’सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहेत.

0
Rahul Gandhi
Rahul Gandhi

नगर : लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहेत.

नक्की वाचा : अमरावतीत बच्चू कडूंचा पोलिसांसमोर राडा;अमित शहांच्या सभेला विरोध

पंतप्रधान मोदींनी तुमचं कर्ज माफ केले नाही,पण आम्ही लगेच करु (Rahul Gandhi )

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. पण आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज लगेच माफ करु. याशिवाय, देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल.

तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योगपतींकडे बघा, त्यांचं घर, गाड्या बघा. ते पाहून आपल्याला लक्षात येईल की, देशात संपत्तीची बिलकूल कमी नाही. जर अब्जाधीश उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर गरिबांचे कर्जही माफ झालं पाहिजे. केंद्र सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतंय,मग शेतकऱ्यांचं कर्ज ही माफ झालेच पाहिजे. अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नये, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

अवश्य वाचा : स्टोइनिसचे शतक ऋतुराजवर पडलं भारी;लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अमरावतीचा समावेश आहे.आज (ता.२४) अमरावतीमधील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सभा या ठिकाणी पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here