Rahuri Election : वांबोरीत अक्षय कर्डिले यांची प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Rahuri Election : वांबोरीत अक्षय कर्डिले यांची प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Rahuri Election : वांबोरीत अक्षय कर्डिले यांची प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Rahuri Election : वांबोरीत अक्षय कर्डिले यांची प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Rahuri Election : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून गावभर भाजप महायुतीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

हेही वाचा : राजूर येथे चोरी केलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

मतदारांना आवाहन (Rahuri Election)

प्रचार फेरीदरम्यान गावातील विविध ठिकाणी मतदारांनी अक्षय कर्डिले यांचे जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण करत आणि जयघोष करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून टाकला. विशेष म्हणजे महिलांनी औक्षण करून कर्डिले यांना आशीर्वाद दिला, ज्यामुळे प्रचार फेरीला भावनिक स्वरूप प्राप्त झाले. अक्षय कर्डिले यांनी या दौऱ्यात घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी मतदारांचे प्रश्न जाणून घेतले आणि विकासाच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्यासाठी मला संधी द्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नक्की पहा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी; मतदारांना काय वाटतं?

उत्स्फूर्त प्रतिसाद (Rahuri Election)

प्रचार फेरीदरम्यान त्यांनी वांबोरीच्या बाजारपेठेलाही भेट देत व्यापाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक प्रश्न, व्यवसायातील अडचणी तसेच विकासाच्या गरजा याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना व्यक्त केली. यावेळी वांबोरी गावातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील विविध भागांतून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत प्रचार फेरीला मोठे रूप दिले. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. गावोगावी जाऊन प्रचार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वांबोरीतील अनेक ठिकाणी नागरिकांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचा संकल्प केला