Robbed at gunpoint | पाथर्डी : अडीच लाख रुपये देण्यासाठी धमकावत तरुणाला गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून ( Robbed at gunpoint ) त्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना पाथर्डी शहरात घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लॉकेट जबरदस्तीने काढून घेतले ( Robbed at gunpoint )
याप्रकरणी राहुल रामदास गर्जे (वय ३४, रा. फुलेनगर, पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडीच लाख रुपये देण्याची मागणी करत संशयितांनी गर्जे यांना धमकावले. त्यानंतर गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नक्की वाचा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार ( Robbed at gunpoint )
दरम्यान, अशा प्रकारे कोणी धमकी देऊन, ब्लॅकमेल करून किंवा दहशत निर्माण करून गैरप्रकार करत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ पाथर्डी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी केले आहे.



