Shri Markandeya Rathotsav : मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात शहरात पालखी रथोत्सव शोभायात्रा उत्साहात

शोभायात्रेत पद्मशाली समाजाच्या पारंपारिक संस्कृतीचे दर्शन

0
Shri Markandeya Rathotsav : मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात शहरात पालखी रथोत्सव शोभायात्रा उत्साहात
Shri Markandeya Rathotsav : मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात शहरात पालखी रथोत्सव शोभायात्रा उत्साहात

Shri Markandeya Rathotsav : नगर : नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त अहिल्यानगरच्या श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज वतीने श्री मार्कंडेय रथोत्सव (Shri Markandeya Rathotsav) पालखी शोभायात्रा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी शहरात करण्यात आले होते. गांधी मैदान येथील ऐतिहासिक मार्कंडेय महामुनींच्या मंदिरात आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हस्ते मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीचे पूजन, आरती झाल्यावर मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात रथोत्सव पालखी शोभायात्रेस सुरुवात झाली. यावेळी पद्मशाली समजाच्या (Padmashali Community) पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी रथयात्रा शोभायात्रा काढण्यात आली.

देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, पंच कमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम, राजू म्यान, बाळकृष्ण सिद्दम व ज्ञानेश्वर मंगलारम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन झाले. यावेळी सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

नक्की वाचा : नाकारलं तेव्हाही दुःख झालं नाही, स्वीकारतायत याचाही आनंद नाही!; डॉ. सुजय विखे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

आमदार संग्राम जगताप म्हणाले की

आमदार संग्राम जगताप म्हणाले, श्री मार्कंडेय रथोत्सव पालखी सोहळ्यास फार मोठी जुनी परंपरा आहे. पद्मशाली समाज ही परंपरा जपत दरवर्षी मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा काढत आहे. या शोभायात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. नव्या पिढीला पद्मशाली परंपरेच्या विचारांचा वारसा यामुळे मिळत आहे, असे सांगून सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मार्कंडेय मंदिराला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा (Shri Markandeya Rathotsav)

श्रीकांत छिंदम म्हणाले, नगरमधील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा व संस्कृती जपत शहरात भव्यदिव्य सोहळ्याने नारळी पोर्णिमा उत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम व विधी झाल्यावर मोठ्या उत्साहात भव्य रथोत्सव मिरवणुकीत काढण्यात आली. यामध्ये शहरातल सर्व समाज एकत्रित येत असल्याने येथे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.

दिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर: श्रीपाद छिंदम

नगरसेवक श्रीपाद छिंदम म्हणाले, शहरातील ऐतिहासिक मार्कंडेय महामुनींच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आता वेगाने प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून पद्मशाली समाजाचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. नारळी पौर्णिमेचा पालखी उत्सव व भव्य मिरवणूक काढून पद्मशाली समजाच्या पारंपारिक संस्कृती जपली आहे.

सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी

प्रास्ताविकात संजय वल्लाकटी यांनी सर्वांचे स्वागत केले. या पालखी रथोत्सव मिरवणुकीत सजवलेल्या रथात मार्कंडेय महामुनींची पालखी ठेवण्यात आली होती. तसेच महादेवाच्या पिंडीला कवटाळून बसलेल्या मार्कंडेय महामुनींची मोठी मूर्ती सजवलेल्या रथात ठेवण्यात आली होती. पद्मशाली समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कापड विणण्याचे हातमाग यंत्रही या मिरवणुकीत होते. पद्मशाली समाजाचे पारंपारिक कोलावू नृत्य पथक, महिलांचे फुगडी पथक, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे टिपरी, लेझीम पथक व लाठीकाठी आदी पथकांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक मल्लखांबांच्या प्रात्यक्षिकांना नागरिकांनी दाद दिली. या मिरवणुकीत तालयोगी ढोल ताशा ध्वज पथक सहभागी होते. रथोत्सव मिरवणुकी दरम्यान सहभागी भाविकांना ठीक ठिकाणी महाप्रसाद, अल्पोपहार, पाणी व सरबताचे वाटप करण्यात येत होते.

युवक युवती मोठ्या संख्यने सहभागी

श्री मार्कंडेय रथोत्सव पालखी सोहळ्याचे नियोजन श्री मार्कण्डेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज दुलम, सरचिटणीस प्रकाश कोटा, खजिनदार अजय म्याना, पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे उपाध्यक्ष बालराज सामल, सरचिटणीस विनायक मच्चा, खजिनदार शंकर येमूल, मार्गदर्शक माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, विनायक गुडेवार, राजू म्यान, ज्ञानेश्वर मंगलारप व भीमराज कोडम आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी पद्मशाली समाजातील महिला, नागरिक, युवक युवती मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.