Slaughter of cattle: गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या १९४ आरोपींवर कारवाई तर ३६ जण जिल्ह्यातून हद्दपार

पोलीस प्रशासनाची कडक भूमिका

0

Slaughter of cattle: नगर: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल (Slaughter of cattle) करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात धडक मोहीम राबवली असून, यात अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात (१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५) तब्बल ६४ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १९४ आरोपींवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ५० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवश्य वाचा- प्रांत व तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर; नागरिकांची कामे खोळंबली

पोलीस प्रशासनाची कडक भूमिका (Slaughter of cattle)

याशिवाय चालू वर्षातही कारवाईची तीव्रता कायम ठेवण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत २० गुन्हे दाखल झाले असून ६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून १ कोटी ५८ लाख ५ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोवंश गुन्ह्यातील आरोपीच्या सहा टोळ्या व ३६ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कत्तलखाने बंद पडले आहेत. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत अनेक आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. तसेच अवैध कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमुळे पोलीस प्रशासनाची कडक भूमिका स्पष्ट होत आहे.