Utkarsha Rupavate : शिर्डी लोकसभेच्या आजी – माजी खासदारांना खुले आव्हान

Utkarsha Rupavate : शिर्डी लोकसभेच्या आजी - माजी खासदारांना खुले आव्हान

0
Utkarsha Rupavate
Utkarsha Rupavate : शिर्डी लोकसभेच्या आजी - माजी खासदारांना खुले आव्हान

Utkarsha Rupavate : संगमनेर: आपण सर्वांच्या साक्षीने मी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे साखदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांना आदरपूर्ण खुले आव्हान देते की, एका विचारपीठावर समोरासमोर बसू या. शिर्डी लोकसभेसाठी तुम्ही काय केलं आणि पुढच्या येणाऱ्या वर्षात मी काय करु शकते यावर चर्चा करु या…. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची (Shirdi Lok Sabha Constituency) आजी-माजी खासदारांची दुरंगी लढत आपल्या दमदार एन्ट्रीने तिरंगी करुन त्यात रंग भरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupavate) यांची ही ललकारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

उत्कर्षा रुपवते यांना संघर्षाचा वारसा (Utkarsha Rupavate)

तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय असलेल्या उत्कर्षा रुपवते यांना संघर्षाचा वारसा लाभला आहे. उच्चशिक्षीत असल्याने शासकिय ध्येय धोरणे राबवण्यासाठी ठाम विचारधारा असलेल्या उत्कर्षा रुपवते यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा होती. राखीव जागेची शेवटची संधी असल्याने त्यांनी त्या उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, दुर्दैवाने त्यांना यात यश आले नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या निकषात शिर्डीची जागा शिवसेना (उबाठा) यांच्याकडे गेल्याने, त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा नाईलाज झाला. मात्र, यामुळे नाराज झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेवून, त्यांच्या पक्षात प्रवेश केला.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

राजकीय धुरंधर श्रीरामपूरच्या भव्य मेळाव्याने अस्वस्थ (Utkarsha Rupavate)

आजवरचे आयुष्य काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी घालवल्यानंतरही, आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मुळची अकोले येथील ही भूमिकन्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी सरसावली. त्यानंतरही तिची एन्ट्री हलक्यात घेणाऱ्या राजकीय धुरंधरांना श्रीरामपूरच्या भव्य मेळाव्याने अस्वस्थ केले. गेल्या आठवड्यापासून पायाला भिंगरी लावून त्यांचा मतदारसंघातील प्रचारदौरा सुरु आहे. त्यात सर्वासामान्यांशी त्यांनी साधलेला संवाद व महिला उमेदवार म्हणून मिळणारा सन्मान पाहता, त्यांच्या प्रयत्नांना गोड फळे लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभुमीवर त्या अधिकच आक्रमक झाल्या असून, प्रथम त्यांनी दोन्ही आजी-माजी खासदारांना लहान बहिण म्हणून तिला मतदान करण्याची गळ घातली होती. त्यानंतर दोघांनाही एका व्यासपीठावर समोरासमोर येवून शिर्डी लोकसभेच्या मतदारांसमोर त्यांचे व्हीजन ठेवण्याचे खुले आव्हान दिल्याने, उत्कर्षा रुपवते चर्चेत आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here