Vari : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम

0
Vari : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम
Vari : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम

Vari : नगर : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, आयुर्वेदिक पद्धतीने पायांची मालिश तसेच अल्पोपहार उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने ‘चरणसेवा उपक्रम – २०२६’ राबविण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह यांनी दिली.

हेही वाचा : ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

असे आहे नियोजन…

हा विशेष उपक्रम १० ते १७ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पालखी मार्गांवर तसेच विसावा स्थळांवर आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज, गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आणि शेवगाव येथील श्री एकनाथ आयुर्वेद रुग्णालयातील शेकडो वैद्यकीय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सेवा देणार आहेत. सततच्या पायी प्रवासामुळे वारकऱ्यांच्या पायांवर येणारा ताण कमी करण्यासाठी वातशामक आयुर्वेदिक तेलाचा वापर करून स्वयंसेवकांकडून पायांची मालिश करण्यात येणार आहे. उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला, विश्रांतीची सुविधा तसेच सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रानुसार चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नक्की पहा : चिमुरड्याचा प्रशासकीय आणि खाजगी बेजबाबदारपणामुळे गेला जीव!

आरोग्यविषयक मार्गदर्शन (Vari)

स्वयंसेवकांना टी-शर्ट, हातमोजे व मास्क उपलब्ध करून देण्यात आले असून वारकऱ्यांसाठी खुर्च्या आणि चटयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य लाभत आहे. निवडक ठिकाणी आरोग्य जनजागृती रथ आणि रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात येणार असून संसर्गजन्य आजारांपासून बचाव, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.