Vivek Kolhe : डॉ. सुजय विखेंनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी; आमदार विवेक कोल्हे, सत्कार समारंभात रंगली जुगलबंदी

कार्यक्रमात रंगली राजकीय जुगलबंदी

0
Vivek Kolhe : डॉ. सुजय विखेंनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी; आमदार विवेक कोल्हे, सत्कार समारंभात रंगली जुगलबंदी
Vivek Kolhe : डॉ. सुजय विखेंनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी; आमदार विवेक कोल्हे, सत्कार समारंभात रंगली जुगलबंदी

Vivek Kolhe : नगर : माजी खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांनी त्याग केला म्हणून आम्हाला आमदार (MLA) होण्याची संधी मिळाली. पद कोणतेही असो ते महत्वाचे असते. प्रत्येक पदाचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केले.

नक्की वाचा : अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

अहिल्यानगरमध्ये नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये आमदार कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य असो की, पंतप्रधानपद प्रत्येक पदाला आपली आपली प्रतिष्ठा असते. या पदासाठी अनेक जण इच्छूक असतात. त्यामुळ प्रत्येक पद तेवढ्याच महत्वाचे असते. आणि त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही कोल्हे म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोल्हे यांचे विधान लक्षवेधक (Vivek Kolhe)

काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यात जुगलबंदी रंगली होती. आपण आता 288 मतदारसंघाचे आमदार असल्याचे कोल्हे एका सत्कार समारंभात म्हणाले होते. त्यांना उत्तर देताना डॉ. विखे यांनी ही पदे आपण सोडून दिली होती, ती यांना मिळाल्याने आता सत्कार घेत आहेत, असे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार कोल्हे यांचे हे विधान लक्षवेधक ठरले आहे. या कार्यक्रमास डॉ. विखे पाटील उपस्थित नव्हते. आमदार कोल्हे यांचे हे विधान या दोन नेत्यांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक वादावर पडदा टाकणारे मानले जात आहे.

कार्यक्रमात रंगली राजकीय जुगलबंदी

यावेळी सभापती राम शिंदे यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना टोला लगावला ते म्हणाले की तनपुरे यांना भाजपमध्ये अस्वस्थ वाटत आहे. मामा तिकडे आसल्यामुळे त्यांना असं वाटत असावं या वाक्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या पुढच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण करणे आपलं कर्तव्य आहे असे त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित आमदारांना सांगीतले. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की कर्जमाफी झाली म्हणून जिल्ह्यातील एका आमदाराने पंढरपूर येथे उपोषण केले आणि अशा नौटंकीला आपले लोक बळी पडतात अशी टिका मंत्री विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली. पुढे ते म्हणाले की शासनाच्या झालेल्या कामाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावांमध्ये फ्लेक्स लावावे जेणेकरून लोकांना कळेल काम कोणी केले असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अक्षय कर्डीले, आमदार अमोल खताळ, आमदार विवेक कोल्हे, आमदार सुनील कर्जतकर, आमदार काशिनाथ दाते, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.