Yoga Day : अहिल्यानगर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
Yoga Day : अहिल्यानगर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
Yoga Day : अहिल्यानगर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

Yoga Day : नगर : कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रीदवाक्याला अनुसरून बंदींच्या शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २३० बंदींनी योग दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगातून निरोगी जीवनाचा संदेश दिला.

हेही वाचा : वडीलांसारखा पेहराव; अक्षय कर्डिलेंनी घेतली आमदारकीची शपथ

यांची उपस्थिती

अहिल्यानगर जिल्हा कारागृह, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (भारत सरकार) पुरस्कृत जनशिक्षण संस्थान, तसेच अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-६ बी. वाय. फड, कारागृह अधीक्षक संतोष कवार, योग प्रशिक्षक संजय सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की पहा : शिर्डीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सुजय विखे नेमकं काय म्हणाले?

प्रमाणपत्रांचे वितरण (Yoga Day)

श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेमार्फत कारागृहात सुरू करण्यात आलेल्या डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बंदींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या बॅरेक्सचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुरुंगाधिकारी विजय साळुंके, अरुण मदने, सुबेदार हिराचंद आंबोरे, हवालदार सुरेश जगर, संदीप जगदाळे, राहुल पठारे, नंदकुमार शिंदे, श्रीकांत गोरवडे, मोहसीन शेख तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.