ZP School : अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद शाळांना कायमचे कुलूप; ९ वर्षांत ७५ शाळा बंद

0
ZP School : अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद शाळांना कायमचे कुलूप; ९ वर्षांत ७५ शाळा बंद
ZP School : अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद शाळांना कायमचे कुलूप; ९ वर्षांत ७५ शाळा बंद

ZP School : नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ शाळांना घटत्या पटसंख्येमुळे कायमचे कुलूप लागले असून, गेल्या नऊ वर्षांत निर्माण झालेल्या या परिस्थितीने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.अहिल्यानगर:ग्रामीण भागातील गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत तब्बल ७५ गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जाणून घ्या आकडेवारी

खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते जाळे, पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे असलेला कल आणि रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. पटसंख्या कमालीची घसरल्यामुळे अखेर प्रशासनाला या शाळा अधिकृतपणे बंद करून येथील उर्वरित विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करावे लागले आहे. जिल्ह्यात शाळा बंद पडण्याच्या या मोहिमेत कर्जत तालुका सर्वात आघाडीवर असून तेथील सर्वाधिक १७ शाळांना कुलूप लागले आहे. त्याखालोखाल नगर तालुक्यात १० शाळा, तर जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी ८ शाळा बंद झाल्या आहेत.

नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

प्राथमिक शिक्षण धोक्यात (ZP School)

एकीकडे पटसंख्या घटत असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद शिक्षकांवर अध्यापनाव्यतिरिक्त बीएलओ ड्युटी, जनगणना आणि विविध शासकीय योजनांच्या सर्वेक्षणासारख्या अवांतर कामांचा मोठा ताण आहे. यामुळे शिक्षकांना वर्गात शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप अनेक पालकांकडून केला जात आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीतील तांत्रिक त्रुटींमुळेही पटसंख्येचे गणित बिघडल्याचे समोर आले आहे. या ७५ शाळा बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुलांचे, विशेषतः दुर्गम भागातील मुलींचे प्राथमिक शिक्षण धोक्यात आले आहे.