Priyanka Kardile | शिवाजीराव कर्डिले यांचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावची ओळख – प्रियंका कर्डिले

Priyanka Kardile | शिवाजीराव कर्डिले यांचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावची ओळख - प्रियंका कर्डिले

0
Priyanka Kardile | शिवाजीराव कर्डिले यांचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावची ओळख - प्रियंका कर्डिले
Priyanka Kardile | शिवाजीराव कर्डिले यांचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावची ओळख - प्रियंका कर्डिले

Priyanka Kardile | नगर : आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे सर्वात जवळचे व जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावाची ओळख होती. या गावावर त्यांचे विशेष प्रेम होते. ही उणीव भरून काढण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या रुपात युवा नेतृत्व पुढे येत असून पोटनिवडणुकीत त्यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन प्रियंका कर्डिले (Priyanka Kardile) यांनी केले.

नक्की पहा : नेवासा मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अखंड हरिनाम सप्ताह

अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ जयंती उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा व ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला, या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या वेळी कोमल वाकळे, आदर्श गावच्या सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे शंकरराव कदम, बाबासाहेब कदम, पंढरीनाथ कदम, विलास भुतकर, सागर कदम यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन

या वेळी शिव महापुराण कथा हारेशजी गिरी महाराज विंचुरकर यांनी प्रभावीपणे सांगितली. सप्ताह दरम्यान शिव महापुराणातील महात्म्य, चंचला वैराग्य, शिवलोक प्राप्ती, कार्तिक स्वामी जन्म, गणेश विवाह, बकासुराला वर प्राप्ती, शिवाचा अवधूत अवतार, शिवमंत्र महोत्सव, बारा ज्योतिर्लिंगांचे महात्म्य तसेच श्रावण भक्ती अशा विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहानिमित्त दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी सहा ते सात विष्णुसहस्रनाम, सकाळी आठ ते अकरा नवनाथ पारायण, दुपारी दोन ते चार भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री साडेसात ते साडेनऊ महापुराण कथा असे नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडले. कथेसाठी साथ-संगत दत्ता महाराज तापकीरे, श्रीकांत महाराज गवळी, भरत महाराज, गोपाळ बापू गुरव आणि विठ्ठल महाराज चव्हाण यांनी दिली.

हे पहा – राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी; मतदारांना काय वाटतं?

सोमवारी (ता. २०) सायंकाळी सात वाजता दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत ईश्वर महाराज कदम शास्त्री यांचे कीर्तन झाले. सप्ताहादरम्यान काकड्याचे नेतृत्व शिवाजी ढोकणे महाराज, विठ्ठल ढोकणे महाराज, काशिनाथ ढोकणे, रावसाहेब नवघरे, बबनदादा गडाख आणि एकनाथ ढोकणे यांच्यासह वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच पारायण व्यासपीठाची जबाबदारी बाबासाहेब गंगाधर कदम, शंतनू महाराज लांबे यांनी सांभाळली. हरिपाठ व नामजपासाठी रोहिदास राधाकिसन कदम, काशिनाथ ढोकणे, भाऊसाहेब कदम, काशिनाथ कदम, प्रल्हाद कदम, रोहिदास कदम, अण्णा गावजी कदम, दत्तात्रय कदम, दादासाहेब कदम आदींचा सहभाग लाभला. चोपदार म्हणून सारंग कदम व भाऊसाहेब कदम यांनी कार्य पाहिले. जालिंदर कदम, शंकरराव कदम, विलास भुतकर, विजय वाघमारे या सर्व धार्मिक उपक्रमांमुळे मांजरसुंबा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.