Closed indefinitely: अन्यथा २७ एप्रिलपासून बेमुदत बंद; पाथर्डीतील कृषी विक्रेत्यांचा इशारा

कृषी अधिकारी, आमदार मोनिका राजळे यांनाही निवेदन

0

Closed indefinitely: पाथर्डी: तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद (Closed indefinitely) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदार व आमदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवासी नायब तहसीलदार किशोर सानप यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा फर्टीलायझरचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत, तालुकाध्यक्ष दिलीप रोकडे, उद्योजक राहुल कारखिले, महादेव दराडे, राहुल दरंदले, धीरज गुंदेचा, जवाहरलाल मंडलेचा, नितीन शिरसाट यांच्यासह तालुक्यातील कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार किशोर सानप व कृषी अधिकारी लोंढे यांना निवेदन देत विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या.

अवश्य वाचाटँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

कृषी अधिकारी, आमदार मोनिका राजळे यांनाही निवेदन (Closed indefinitely)

निवेदनात परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करणे, ऑनलाईन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करणे, खत, बियाणे व कीटकनाशक विक्रीवरील निर्बंध शिथिल करणे, बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कठोर कारवाई करणे, विक्रेत्यांकडून घेतलेली अनामत रक्कम परत करणे, तसेच तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी खतांचे नियोजनबद्ध वितरण करावे, तसेच थेट कंपन्यांकडून होणाऱ्या विक्रीमुळे स्थानिक विक्रेत्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशाही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कृषी अधिकारी तसेच आमदार मोनिका राजळे यांनाही संपाबाबत व मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. शासनाने आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे २७ एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.या संभाव्य आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशके मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here