Women’s Reservation Bill : संगमनेर : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) नामंजूर होताच सत्ताधारी रस्त्यावर उतरत विरोधकांनी लोकशाहीची कशी हत्या केली, याबाबतची टीका करत आहेत. भाजपच्या या टीकेला प्रतित्युत्तर देण्यासाठी काँग्रेसही आता मैदानात उतरली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बुधवार (ता.२२) येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन भाजपच्या टीकेला उत्तर दिले.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
महिला आरक्षणाचे नाव पुढे करून मांडण्यात आलेली १३१ वी घटनादुरुस्ती हा लोकशाहीवर मोठा आघात होता. तो हाणून पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले आहे. जनगणनेशिवाय आरक्षण देणे अशक्य असताना भाजप केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी डीलिमिटेशनचा (मतदारसंघ पुनर्रचना) खेळ खेळत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. माजी मंत्री थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फेटाळलेला प्रस्ताव हा लोकशाहीचा विजय (Women’s Reservation Bill)
भाजपचा महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा असून हेतू मात्र, राजकीय आहे, असे स्पष्ट करत यावेळी ते पुढे म्हणाले, १३१ व्या घटनादुरुस्तीचा फेटाळलेला प्रस्ताव हा लोकशाहीचा विजय आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, उलट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच महिला सबलीकरणाची पायाभरणी केली. काँग्रेसने महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. याचबरोबर काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे.
अद्याप जनगणना झालेली नाही
भाजपने २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे बिल मंजूर केले, तेव्हा भाजपाने जनगणनेनंतर अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप जनगणना झालेली नाही. महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा वापरून, मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे हिंदी पट्ट्यात १३१ जागा वाढवून सत्ता काबीज करण्याचा भाजपचा ’प्लॅन’ आहे, अशी टीका त्यांनी केली. यामुळे दक्षिण भारतावर अन्याय होणार असून तिथे केवळ ४४ जागा वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचा हेतू चांगला नसून सत्तेसाठी ते काहीही करतात अशी टीका त्यांनी केली.



