Property Tax : नगर : घरपट्टीच्या (Property Tax) चुकीच्या सर्वेक्षणाचा (Survey) मुद्दा सभेत पुन्हा समोर आल्याने व या माध्यमातून कर्मचारी नागरिकांशी तडजोडी करत असल्याचे आरोप झाल्यामुळे या विषयावर संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देशही सभापती सुभाष लोंढे (Subhash Londhe) यांनी दिले. तसेच, शहरातील सर्व ओढे व नाल्यांची साफसफाई (Cleaning of Drains) पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. संबंधित नगरसेवकांचे काम पूर्ण झाल्याचे पत्र घ्यावे. शहरातील अंतर्गत गटारी व नाल्यांचीही सफाई पूर्ण करावी, अशा सूचना स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
एजन्सीने जाणीवपूर्वक चुकीची नोंद लावली – निखिल वारे
अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यात शहरातील घरपट्टी सर्वेक्षणाच्या गोंधळावरूनही पडसाद उमटले. एकाच आकाराच्या घरांना वेगवेगळी घरपट्टी लावली जात असून, एजन्सीने जाणीवपूर्वक चुकीची नोंद लावल्याचा मुद्दा निखिल वारे यांनी मांडला. महापालिकेचे कर्मचारी नागरिकांशी तडजोड करून ती बिले कमी करतात, असे सांगत याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. सभापती सुभाष लोंढे यांनी तत्काळ यावर बैठक लावण्याचे आदेश दिले. ओढे-नाल्यांतील साफसफाईबाबत बोलताना, नगरसेवकांचे पत्र घेऊन जेवढे तास काम होईल तेवढेच बिल मंजूर करावे आणि वैष्णवी कॉलनी व नरहरी नगर परिसरातील ओढ्यांवरील अतिक्रमणे काढून प्रवाह मोकळे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जुलै महिन्यापर्यंत शहरासाठी पाणीसाठा राखीव (Property Tax)
दरम्यान, नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी पावसाचा अंदाज, संभाव्य पाणी कपात आणि शासनाच्या पत्राबाबत माहिती विचारली. यावर प्रभारी जलअभियंता गणेश गाडळकर यांनी माहिती दिली. सध्या धरणाची पाणी पातळी १७८३ असून ती १७५२ पर्यंत राहणे अपेक्षित आहे. त्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे. सध्या एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी कपातीचे कोणतेही नियोजन नाही, असे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यापर्यंत शहरासाठी पाणीसाठा राखीव असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.



