Census : पाथर्डी : देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मानली जाणारी जनगणना (Census) ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून, तिच्या अचूकतेवरच विकासाच्या योजनांचा आधार असतो. त्यामुळे प्रत्येक घराची माहिती अचूक व बिनचूक नोंदविण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे, असे प्रतिपादन तहसिलदार डॉ.उद्धव नाईक (Dr. Uddhav Naik) यांनी केले.पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण शिबिराच्या (Census Training Camp) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
जनगणने दरम्यान चुकीची माहिती देणे कायद्याने दंडनीय
डॉ. नाईक पुढे म्हणाले की, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत असून, नागरिकांना ‘स्वगणना’ पद्धतीद्वारे स्वतःची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्यानंतर संबंधित शिक्षक प्रत्यक्ष भेट देऊन त्या माहितीची पडताळणी करतील. यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. जनगणने दरम्यान चुकीची माहिती देणे अथवा नोंदविणे हे कायद्याने दंडनीय असून, अशा प्रकारांना दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून अचूक माहिती देणे अवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज (Census)
जनगणना कार्यात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करून या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे .कार्यक्रमाच्या शेवटी जनगणना कार्य प्रभावीपणे पार पाडण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सुनिल कटारिया यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन तर प्राचार्य अजय भंडारी यांनी आभार मानले. यावेळी, नायब तहसिलदार किशोर सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, प्राचार्य अजय भंडारी, उपप्राचार्य उपप्राचार्य अशोक गर्जे, पर्यवेक्षिका मनीषा मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.



