Radhakrushn Vikhe Patil : ‘महाविकास आघाडी एक नाटक कंपनी’; मंत्री विखे यांची खोचक टीका

0
Radhakrushn Vikhe Patil : ‘महाविकास आघाडी एक नाटक कंपनी’; मंत्री विखे यांची खोचक टीका
Radhakrushn Vikhe Patil : ‘महाविकास आघाडी एक नाटक कंपनी’; मंत्री विखे यांची खोचक टीका

Radhakrushn Vikhe Patil : नगर : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारत अंबादास दानवे यांना दिली यावरून मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, ही महाविकास आघाडी नाही तर महा भकास आघाडी आहे सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले हे नेते आहे कुठल्याही तत्त्वाशी हे जे बांधिलकी नाही हिंदुत्वाला पायदळी तुडवण्याचा काम ठाकरेंच्या शिवसेनेने केले तसेच काँग्रेसचे देखील अधोगती झालेली आहे त्याचबरोबर उबाठाची देखील अधोगती कडे वाटचाल सुरू आहे त्यामुळेच ठाकरेंनी माघार घेतली असावी असा, खोचक टोला मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावला

हेही वाचा :  पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

महाविकास आघाडी नाटक कंपनी

महाविकास आघाडी व ती टीका करताना मंत्री विखे म्हणाले महाविकास आघाडी ही एक नाटक कंपनी आहे त्यामुळे उमेदवारीवरून त्यांच्यामध्ये नाट्यमय घडामोडी होणारच पब्लिक डिमांड प्रमाणे आपला खेळ बदलतच राहायचा अशा शब्दात मंत्री विखे यांनी महाविकास आघाडी वरती जोरदार निशाणा साधला. मराठी सक्तीच्या विषयावरून राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत आता राज ठाकरे हे आक्रमक झालेले आहे, यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले मराठी सत्य बाबत काही कालावधी देण्यात आलेला आहे त्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही काही लोकांनी परप्रांती यांच्या विरोधात राजकारण केले आहे आपली वोट बँक तयार केलेले आहे हा वोट बँक तयार करण्याचाच प्रकार आहे अशा शब्दात मंत्री विखे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरती निशाणा साधला.

नक्की पहा : महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात

विरोधकांचा समाचार (Radhakrushn Vikhe Patil)

महाराष्ट्रात जर काम करायचं असेल त्याला मराठी सक्ती पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, असंही विखे म्हणाले आणि दुर्दैवाने विरोधकांकडे कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही कोणताही निर्णय घेतला तर ते केवळ त्यामध्ये राजकारणच करणार कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे सरकार गतिमान पद्धतीने निर्णय करता यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी विरोधकांची ही सुरू असलेली धडपड आहे असे शब्दात विखे यांनी विरोधकांचाही समाचार घेतला.