Sunny Jadhav | नगर : अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरात रविवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. रील स्टार सनी जाधव (Sunny Jadhav) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हे वाचा – बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई
हल्ल्यात ते बचावले (Sunny Jadhav)
मिळालेल्या माहितीनुसार, सनी जाधव हे कल्याण रोड परिसरात असताना अचानक काही संशयितांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले असून त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
दोन संशयित तब्यात (Sunny Jadhav)
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, सोशल मीडिया प्रसिद्धी किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे पहा – लोखंडांवर घाव घालणाऱ्या हातांनी मिळविले युपीएससीत यश; अक्षय पवार यांची प्रेरणादायी यशोगाथा
या घटनेमुळे अहिल्यानगर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



