Balasaheb Thorat | उसाचे क्षेत्र आणि एकरी उत्पादन वाढवा; बाळासाहेब थोरात यांचे मत

0

Balasaheb Thorat | संगमनेर : दूध व ऊस हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहेत. त्यांना जपले पाहिजे साखर व्यवसाय सध्या अडचणीत असून निर्यात थांबली आहे. साखर कारखान्यांमध्ये खाजगींची संख्या वाढत असून स्पर्धा वाढली आहे. अशा काळात उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर उसाची उत्पादकता एकरी 100 टन करावी असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. संगमनेर तालुक्याच्या हक्काचे पाणी व रोटेशन काळात 11 तास वीज मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

हे वाचा – बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई

साखर व्यवसाय अडचणीत (Balasaheb Thorat)

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात थांबवली आहे त्यामुळे साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आली तर अर्थव्यवस्था कोलमडेल. खासगी कारखान्याची संख्या वाढली आहे. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. अशा काळामध्ये मोठी स्पर्धा वाढली आहे. आपल्या कारखान्यात अल्कोहोल वीज निर्मिती काटकसर योग्य वेळी योग्य निर्णय यामुळे चांगली वाटचाल सुरू आहे. 

नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

एकरी उत्पादकता वाढवली पाहिजे (Balasaheb Thorat)

दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी उत्पादकता वाढवली पाहिजे. याचबरोबर रोटेशन सुरू असताना 11 तास वीज मिळाली पाहिजे. अकरा तास वीज  हा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र आता फक्त पाच ते सहा तास लाईट मिळत आहे तरी सर्वजण गप्प आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. तालुक्याला हक्काचे पाणी आणि वीज मिळालीच पाहिजे अशी मागणी करताना. धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून अनेक भूलथापांमुळे मूळ विषयांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ अशोक कडलग म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळात सहकारातील जाणकार नेते बाळासाहेब थोरात व राजेश टोपे यांची निवड केली. या क्षेत्रातील ते अनुभवी असून ऑस्ट्रेलियातील संशोधनाचा फायदा आपल्या विभागाला व्हावा याकरता त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे असून कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखत यांसह रोपांची लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपण एकरी उत्पादन वाढू शकतो. याचबरोबर या काळात येणारे भुंगेरे कमी करण्याकरता नवीन तंत्रज्ञानाच्या टिप्स त्यांनी सांगितल्या. 

माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार समृद्ध असून कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन होण्याकरता या ऊस विकास मेळाव्यांचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मृदा शास्त्रज्ञ डॉ अभिनंदन पाटील यांनी माती परीक्षण सेंद्रिय खत ठिबक सिंचन फायदे याविषयी माहिती दिली. यावेळी अनिल थोरात, नामदेव शिंदे ,सुभाष जगन्नाथ थोरात, मीनानाथ वर्पे, शिवाजी जगताप, यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पहा – लोखंडांवर घाव घालणाऱ्या हातांनी मिळविले युपीएससीत यश; अक्षय पवार यांची प्रेरणादायी यशोगाथा

जगन्नाथ घुगरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पा. घुले यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी सभासद ऊस उत्पादक युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here